शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत ७५७७४ नमुने पाठविले असून यापैकी ७५१३२ प्राप्त तर ६४२ अप्राप्त आहेत. तसेच ६६४४९ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या ९८ जणांमध्ये पुरुष ६३ व महिला ३५ आहेत. यात आर्णी तालुक्यातील एक पुरुष, बाभुळगाव तालुक्यातील एक पुरुष व एक महिला, दारव्हा शहरातील एक पुरुष, दिग्रस शहरातील चार पुरुष व दोन महिला, घाटंजी शहरातील चार पुरुष व सहा महिला, महागाव शहरातील पुरुष १६ व १३ महिला, महागाव तालुक्यातील एक पुरुष, मारेगाव शहरातील दोन पुरुष व दोन महिला, नेर शहरातील एक पुरुष व एक महिला, पांढरकवडा शहरातील एक पुरुष व दोन महिला, उमरखेड शहरातील चार पुरुष व एक महिला, वणी शहरातील तीन पुरुष, यवतमाळ शहरातील २३ पुरुष व सात महिला, यवतमाळ तालुक्यातील एका पुरुषाचा समावेश आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून माहिती प्राप्त न झाल्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत २०४ 'ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह' भरती असून होम आयसोलेशनमध्ये भरती असणा-यांची संख्या निरंक असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाने म्हटले आहे. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ८६८३ झाली आहे. जिल्ह्यात २७० मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात २५९ जण भरती आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response