यवतमाळ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या ३४ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात २३ जण नव्याने पॉझिटीव्ह आढळले असून एका कोरानाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला. मृतकामध्ये राळेगाव तालुक्यातील येथील ३५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
बुधवारी ३४ जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या ९१८९ आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३४९ मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत ९२६६५ नमुने पाठविले असून यापैकी ९२२१० प्राप्त तर ४५५ अप्राप्त आहेत. तसेच ८१८५२ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि.४) एकूण ३३५ रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी २३ जण नव्याने पॉझिटीव्ह तर ३१२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले. जिल्ह्यात सद्यस्थितीत ३४४ 'ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १०३५८ झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response