भीषण अपघातात दोन भाऊ जागीच ठार
संतोष अक्कलवाल । घाटंजी : नातेवाईक च्या मयती साठी दुचाकीने गेलेल्या ऊईके भावंड्यावर काळाने झडप घातली. अन् दोन्ही भावांनी काही वेळातच जीव सोडल्याची घटना घडली.ही घटना मारेगांव तालुक्यातील करणवाडी फाट्यासमोर रात्री ९ वाजताच्या दरम्यान घडली. विजय रामभाऊ ऊईके (४८) आणि तुकाराम रामभाऊ ऊईके वय (५५) दोघे रा.धर्मशाळा वार्ड घाटंजी असे मृतकाचे नाव आहे.
मृतक तुकाराम आणि लहान भाऊ विजय ऊईके हे दोघेही मयतीवरून घराकडे परत येत असताना त्यांचा दुचाकीला अपघात झाला.यात विजय ऊईके हा जागीच ठार झाला.तर तुकाराम गंभीर जखमी झाला असता त्याला उपचारासाठी रूग्णालयात नेताना त्याचा सुध्दा मृत्यू झाला. मृतक दोघेही भाऊ हे दुचाकी क्रमांक एम.एच.२९ बि. के.९१०२ जात असताना करणवाडी फाट्या समोर अपघात झाल्याची माहिती गावातीलच अमोल पांडे, आशीष ऊरकुडे, सुनील मोहितकर, किशोर कनाके यांना कळताच यांनी तत्काळ पोलीस स्टेशनला माहिती दिली.
एकाच दिवशी दोन्ही भावांनी घेतला जगाचा निरोप
तुकाराम मोठा तर विजय हा लहान दोघांचा जन्म सात वर्षाच्या अंतराने झाला.दोघेही एकाच आईची मुले.जन्म जरी सात वर्षाच्या अंतराने झाला असला तरी दोघांनी जगाचा निरोप एकाच वेळी घेतलं.त्यामुळे हळहळ व्यक्त केल्या जात आहे. विजय ऊईके हा परिवहन विभागात एसटी चालक म्हणुन नोकरी करित होता.तर तुकाराम हा शेती करित होता.दोघांच्या जाण्याने ऊईके कुटूंब उघड्यावर पडले आहे.
दरम्यान मारेगाव पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा विजय हा जागीच ठार झाला होता. तर तुकाराम गंभीर अवस्थेत पडून होता. काही युवकांनी गंभीर जखमी असलेल्या तुकाराम ऊईके ला वाचवण्यासाठी तात्काळ मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करून त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केले. मात्र तुकाराम ऊईकेला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. या घटनेमुळे ऊईके परिवार रस्त्यावर आला आहे.
छान वृतांकन
उत्तर द्याहटवा