यवतमाळ शहरातील एक महिला सदर डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पीटल येथे दि.१३ ऑक्टोबर रोजी उपचारार्थ दाखल झाली होती. चाचणी केली असता सदर महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा दि.१६ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री मृत्यु झाला. उपचाराकरीता लागलेला खर्च म्हणून डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पीटलने ९७२५० इतकी आगावू रक्कम भरणा करून घेतल्याची तक्रार संबंधित कुटुंबियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात आली.
या प्रकरणात तक्रारीचे तातडीने निरसण व्हावे व पिडीतास न्याय द्यावा, या अनुषंगाने जिल्हाधिकारी सिंह यांनी शुक्रवार दि.२० नोव्हेंबर रोजी त्यांच्या दालनात सुनावणी आयोजित केली. सदर सुनावणीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारदार व संबंधित हॉस्पीटलचे संचालक यांचे बयाण ऐकून घेऊन तसेच उपस्थित अधिकारी यांनी सदर तक्रारीच्या अनुषंगाने काढलेले निष्कर्ष याबाबत पडताळणी केली. कोणत्याही डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पीटलने शासनाच्या मार्गदर्शक सुचनेच्या नमुद दरापेक्षा जास्त रक्कम कोणत्याही रुग्णाकडून घेऊ नये. तातडीने सदर प्रकरणातील सत्यता तपासून माझ्या समक्ष अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले. तसेच प्रशासन कोणत्याही रुग्णावर अन्याय होऊ देणार नाही, असेही त्यांनी आश्वस्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response