Breaking

Post Top Ad

सोमवार, ३० नोव्हेंबर, २०२०

किरण सरनाईक विरोधात गुन्हा दाखल

किरण सरनाईक विरोधात गुन्हा दाखल
अमरावती पदवीधर मतदार संघाची निवडणूकीची प्रचार तोप सोमवारी थांबली मात्र आदर्श आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी अमरावती विभागीय शिक्षक संघाचे अधिकृत उमेदवारी किरण रामराव सरनाईक आणि अन्य तीन शिक्षकांवर आचारसंहितेचे भंग केल्या प्रकरणी आर्णी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांचा प्रचार करित मतदारांना प्रलोभन देण्याचा उद्देशाने पैठणी साड्या व रोख रक्कम बाळगून आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्णी येथील ड्रीम लाॅन्ड सिटी परिसरात वाशिम येथील शिक्षक खुशाल भाऊराव राठोड,शंकर रामचंद्र रोही,पंजाबराव भिमराव पडघम हे साड्या आणि पैसे वाटप करत होते.दरम्यान यवतमाळ येथील भरारी पथकाने शिक्षकांना रंगेहात पकडून त्यांच्या कडून ४९ साड्या आणि २७ हजार रूपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.


दरम्यान या घटनेची फिर्याद राजेश अशोकराव नागलकर,मंडळधिकारी तथा आचारसंहिता पथक प्रमुख यांनी आर्णी पोलिसात दिली.त्या वरून पोलीसांनी अमरावती विभागीय शिक्षक संघाचे अधिकृत उमेदवार किरण रामराव सरनाईक आणि अन्य चार शिक्षका विरूद्ध आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी कलम १८८, १७१, भादवी कलम १२३(१)(क) (ख) लोकप्रतिनिधी अधिनियम १९१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.त्यामुळे शिक्षकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad