Breaking

Post Top Ad

शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०२०

शाळा सुरू करण्यासाठी समितीचे गठण

शाळा सुरू करण्यासाठी समितीचे गठण

आर्णी येथे कोरोना तपासणी करिता शिक्षकांनी केलेली गर्दी

यवतमाळ : राज्यातील इयत्ता 9 वी ते इयत्ता 12 वी चे वर्ग तसेच इयत्ता 9 वी ते इयत्ता 12 वी चे वसतीगृह व आश्रमशाळा सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यातही शाळा सुरू करण्यापूर्वी व शाळा सुरु झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षा विषयक उपाययोजनाची तपासणी करण्याकरीता प्रत्येक तालुकासाठी तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात येत आहे.

यात उपविभागीय अधिकारी (संबंधीत तालुक्याचे) हे अध्यक्ष, तहसीलदार शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि. प. यवतमाळ, मुख्याधिकारी नगर परिषद / नगर पंचायत आणि पंचायत समितीचे गट‍ शिक्षणाधिकारी हे सदस्य तर तालुका आरोग्य अधिकारी हे सदस्य सचिव आहेत.

उपरोक्त गठीत समितीचे अध्यक्ष व सदस्य सचिव यांनी जिल्ह्यातील शाळा सुरु करण्यापूर्वी व शाळा सुरु झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षा विषयक उपाययोजनाची अंमलबजावणी होते किंवा कसे ? याबाबतची वेळोवेळी तपासणी करून त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad