Breaking

Post Top Ad

शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०२०

ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम नव्याने होणार जाहीर

ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम नव्याने होणार जाहीर

मुंबई: राज्यातील १९ जिल्ह्यांतील एक हजार ५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका नव्याने जाहीर होणार असल्याचे राज्य निवडणुक आयुक्त यू.पी.एस.मदान यांनी सांगितले आहे.


राज्यात १९ जिल्ह्यात पहिल्या टर्म मधील १ हजार ५६६  ग्रामपंचायत करिता दि.२४ फेब्रुवारी २०२० रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.त्या अनुषंगाने दि.३१ मार्च मतदान देखील पार पडणार होते.मात्र कोरोनाचा उद्रेक लक्षात घेता दि.१७ मार्च रोजी उमेदवारी अर्ज छाननीच्या टप्यावर ही निवडणूक कार्यक्रमाला स्थगित देण्यात आली.

ऐन उमेदवारी अर्ज छाननीच्या दरम्यान निवडणूकीला स्थगित करण्यात आल्याने निवडणूका कधी होईल यांची चर्चा गावगाड्याच्या राजकीय नेत्यांमध्ये सुरू असताना त्यातच आता ग्रामपंचायतीच्या नव्याने निवडणूक कार्यक्रम नव्याने जाहीर होणार असल्याचे निवडणूक आयुक्त यांनी जाहीर केले आहे. 

२०१९ च्या विधानसभेच्या मतदार यादीवरून ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदार याद्या तयार झाल्याने १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित होती.मात्र निवडणूक आयोगाने आता दि.१ जानेवारी २०२० या अर्हता दिनांकावर आधारित अद्ययावत मतदार यादी दि.२५ सप्टेंबर २०२० रोजी प्रसिद्ध केली. त्यामुळे नव्याने मतदार यादीत नाव नोंदवलेल्यांना निवडणूक लढवता यावी अथवा मतदान करता यावे म्हणुन राज्य निवडणूक आयोगाच्या दि.५ फेब्रुवारी २०२० च्या आदेशान्वय ग्रामपंचायत निवडणूकीसाठी तयार करण्यात आली आहे.परिनामी आता या निवडणुकांसाठी नव्याने कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad