Breaking

Post Top Ad

रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

"पोलीस अधिक्षकांच्या संपतीची चौकाशी करा": रजनिकांत बोरोले

"पोलीस अधिक्षकांच्या संपतीची चौकाशी करा": रजनिकांत बोरोले

तात्कालीन पोलीस अधिक्षक विरूद्ध सामाजिक कार्यकर्ता सामना 

यवतमाळ: पांढरकवडा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा याचिका कर्ता रजनिकांत बोरोले यांनी रमैय्या कन्नन पती मेघनाथन राजकुमार जिल्हा पोलीस अधिक्षक यवतमाळ सध्या लोह मार्ग नागपुर यांच्या विरुद्ध अत्यंत गंभीर स्वरूपाची तक्रार पुराव्या नुसार विशेष प्रादेशिक व्यवस्थापक प्रवर्तन निर्देशालय अणि मुख्य सचिव मंत्रालय मुंबाई यांचे कडे दाखल केल्याने पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

विस्तृत प्रकरण असे की, यवतमाळचे तात्कालीन पोलीस अधिक्षक एम.राज कुमार यांनी पत्नी रमैय्या हिच्या नावाने मौजा नायगांव ता. वणी जि. यवतमाळ येथे पेट्रोल पंपच्या व्यवसाय चा परवाना मिळविला ह्या करीता 'रमैय्या'च्या नावाने ३५ लाख रूपयाची शेती विकत घेतली आहे. रमैय्या किवा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांच्या पूर्वजांन मध्ये कोणीच शेतकरी नाही.


पोलीस अधिक्षक या पदावर कार्यरत होऊन एम.राजकुमार यांना सहा वर्ष होत आहे.त्यांचा वेतन चा खर्चाचा वजा हिशोब केल्यास आणि आयकर विवरण तापसल्यास इतकी मोठी रक्कम कशी गोळा केली? शेत जमीन, घर, भूखंड, गाडी, बॅक बैलेन्स,दागीने इत्यादी संपती कोणत्या पद्धतीने गोळा केली आहे अणि कोणी दिली आहे यांची सखोल चौकाशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रजनिकांत बोरोले यांनी केली आहे.

 

पती-पत्नी मूळ मरम बडी जिल्हा दिंडीगुल तामिळनाडु येथील रहवासी आहे.महाराष्ट्र जमीन महसूल पुस्तिका खंड दोन (ड) महसुली पुस्तिका परिपत्रक क्र.७, नियम ११ एक, (दोन),(ई) नुसार आणि नियम ११, दोन, (ड) नुसार जमीन खरीदार  शेतकरी असने आवश्यक आहे. महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६५ व विदर्भ कुळ कायदा अन्वये कुटुंब मध्ये शेत जमीन नसल्यास  महाराष्ट्र राज्य (विदर्भ  प्रदेश) या मध्ये शेत जमीन विकत घेता येत नाही.


सामाजिक कार्यकर्ते रजनिकांत बोरोले यांनी तात्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी त्यांच्या अर्धांगीणी च्या नावावर घेतलेल्या लाखो रुपयांची शेतीचा प्रकरण पुढे आणला आहे.त्यामुळे पोलीस खात्यात मोठ्या पदावर असलेल्या राजकुमार यांनी एवढी मोठी रक्कम कोणत्या मार्गाने आणि कुठून आणली अशा सवाल सामाजिक कार्यकर्ते बोरोले यांनी उपस्थितीत केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad