Breaking

Post Top Ad

गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०२०

विधान परिषद निवडणुक:संविधानाच्या भावनेवरच कुठाराघात!

विधान परिषद निवडणुक:संविधानाच्या भावनेवरच कुठाराघात!
राज्यात विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक अशा पाच मतदारसंघात एक डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीत सारेच राजकीय पक्ष उतरल्यामुळे  संविधानाच्या भावनेची कोणालाही घेणे - देणे नाही हे एकदा स्पष्ट झाले आहे. वास्तविक पाहता विधान परिषदेच्या बहुमत किंवा अल्पमतावर सरकारचे जीवन-मरण अवलंबून नाही. ते विधानसभेतील बहुमताच्या आधारावर ठरलेले असते. त्यामुळे हा विषय अधिकच गंभीर होतो. दोन चार उमेदवार निवडून आले काय किंवा पराभूत झाले काय सरकार मध्ये काहीही फरक पडत नाही.असे असताना शिक्षक आणि पदवीधरांना आपले उमेदवार उभे करण्याचे निदान स्वातंत्र्य राजकीय पक्षांनी,या निवडणुकीत न पडता,दिले पाहिजे.पण आपल्याकडे तसे घडत नाही.

चिंताजनक बाब म्हणजे सत्ता लोभापायी  विधान परिषदेतील आमदार जेव्हा विधानसभेची निवडणूक लढवतात आणि विधान परिषदेची जागा रिकामी करून सरकारला प्रचंड खर्चात पाडतात तेव्हा अशा आमदारांकडून निवडणुकीचा सारा खर्च वसुल केला पाहिजे. विधान परिषदेतून निवडून आलेले भाजपचे आमदार चंद्रकांत दादा पाटील विधानसभा निवडणूक लढवून आमदार झाले.त्यांनी विधान परिषदेचा राजीनामा दिला.सत्तेसाठी केलेला हा आगाऊपणा मतदारांनी हाणुन पाडला पाहिजे.नीतिमत्तेचे सातत्याने धडे देऊन शहाणपण शिकवणाऱ्यांनी  निदान पार्टी विथ डिफरन्स चा ढोल तरी फिटणे बंद केले पाहिजे. सारेच एका माळेचे मणी आहेत हे कबूल केले पाहिजे.पाचही मतदार संघात 'भाजप'ने उमेदवार उभे केले आहेत.

पुणे - नागपूर आणि औरंगाबाद हे तीन मतदारसंघ पदवीधरांचे आहेत तर अमरावती आणि पुणे मतदार संघ शिक्षकांसाठी आहेत. पुणे मतदारसंघातून चंद्रकांत दादा पाटील,नागपूर मधून अनिल मधुकर सोले, औरंगाबाद मधुन सतीश भानुदास चव्हाण, अमरावती मधून श्रीकांत देशपांडे आणि पुणे शिक्षक मतदारसंघातून दत्तात्रय अच्युत सावंत निवडून आले होते.या सर्व जागा रिक्त होत असल्याने निवडणुका होत आहेत. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे आणि औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ,काँग्रेसने पुणे शिक्षक व नागपूर पदवीधर मतदार संघ आणि  शिवसेनेने अमरावती शिक्षक मतदार संघ वाटून घेतला आहे. अरुण लाड सतीश चव्हाण जयंत असं गावकर अभिजित वंजारी आणि श्रीकांत देशपांडे असे त्यांचे उमेदवार उभे आहेत.

प्रा.न.मा.जोशी : ८८०५९४८९५१

या निवडणुकीचे खास वैशिष्ट्य म्हणजे काल पर्यंत जे तुझ्या गळा माझ्या गळा घडणूक लढवत होते ते आता एकमेकांचा गळा कापायला सज्ज झाले आहेत. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातफुट पडल्याने या शिक्षक संघातून बाहेर पडले विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नेते वसंतराव खोटरे यांनी विमाशिसं नेते विश्वनाथ डायगव्हाणे यांना झटका देत पश्‍चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची स्थापना केली. अमरावती, यवतमाळ, अकोला आणि वाशिम या पाचही जिल्ह्यातील ५६ तालुक्यांमध्ये वसंतराव खोटरे यांनी कार्यकर्त्यांची नेटवर्क तयार करून लोकशाही पद्धतीने उमेदवाराची निवड संघटनेच्या आमसभेत केली.

विलास सावरकर हे त्यांचे उमेदवार आहेत.आपली जुनी चमू वसंतराव खोटरे यांनी विश्वासात घेतली.आणखी महत्त्वाची बाब म्हणजे वसंतराव खोटरे ६ वर्षांपूर्वी भाजपात प्रवेश केला.पदवीधर मतदार संघात डॉ.रणजीत पाटील साठीकाम केले मात्र यावेळी शिक्षक हा राजकारणी नसावा तो कुठल्याही पक्षाचा असू नये ही भूमिका घेतल्यामुळे वसंतराव खोटरे यांनी आपला स्वतंत्र उमेदवार उभा केला आहे. आपली भूमिका ते स्पष्ट करून सांगत आहेत. विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडेवर  टीकेची जोरदार झोड उठवत आहे. डायगव्हाणे यांच्या संघटनेने देखील उमेदवार उभा केला आहे.डायगव्हाणे देखील काल पर्यंत बी. टी. देशमुख यांच्यासोबत होते. विजूक्टा उमेदवार बोरडे यांना बीटींचा पाठींबा आहे ? भाजपचा पाठिंबा नेहमीच महाराष्ट्र शिक्षक परिषदेला असतो.पण भाजपने स्वतंत्र उमेदवार उभा केला. 

माध्यमिक शिक्षक परिषदेने देखील स्वतंत्र उमेदवार उभा केला.कधी नव्हे एवढा अमरावती शिक्षक मतदार संघात उमेदवारांचा ही पोळा फुटला आहे.तब्बल सत्तावीस उमेदवार आहेत.कोणी शिवाजी शिक्षण संस्थेचा आशीर्वाद असल्याचे सांगत आहेत,कोणाच्या पाठीशी बी.टी. देशमुखांचे पाठबळ आहे तर श्रीकांत देशपांडे ना मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे.भाजपच्या उमेदवारांसाठी देवेंद्र फडणवीस रान करीत आहेत.पश्चिम मतदार संघात वसंतराव खोटरे यांनी आपल्या ला उमेदवारी देऊन कार्यकर्त्यांचा सन्मान केल्याचे विलास सावरकर सांगत आहेत.३५००० मतदार सत्तावीस पैकी कुणाला विधान परिषदेत पाठवतात हे १ डिसेंबरला स्पष्ट होणार. आहे.दि.३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची एक महत्त्वाची गंमत म्हणजे अधिकतम संघटना,उमेदवार ज्या दोन तीन गोष्टींना महत्त्व देत आहे त्या म्हणजे उमेदवार शिक्षकच असावा,२००५ पूर्वी ची पेन्शन योजना पुन्हा लागू करा, आणि विनाअनुदानित शाळा काॅलेजला अनुदान द्या.अशा प्रकारच्या भूमिका घेऊन अधिकतम उमेदवार निवडणूक लढत आहे.

अनिल काळे या उमेदवारांनी तर म्हटलें आहे की आता "एक लक्ष! संस्थानिक नाही ,जो शिक्षक नाही" ! संस्थाचालक आणि शिक्षक नसलेल्या उमेदवाराला पाठवायचे नाही. मात्र गंमत अशी की कुणालाही उभे राहण्याचे स्वातंत्र्य कायद्याने दिले आहे त्याचे काय? सर्वात महत्त्वाचा प्रश्न हां की आज आहेते प्रश्न सहा वर्षापूर्वी देखील कायम होते .मग या सहा वर्षात निवडून आलेल्या शिक्षक मतदार संघातील  सातहीआमदारांनी काय केले हा हा प्रश्न सामान्य शिक्षक विचारत आहे ,ही निवडणूक सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा  वेगळी  असते असे म्हटल्या जात असले तरी  पळसाला पाने तीन असा अनुभवआहे .निवडणुकीत तंत्रज्ञानाचा बाकी उमेदवारांनी जोरदार वापर करून नव्या काळाशी स्वतःला जुळवून घेतले आहे. दुसरी गंमत म्हणजे कुणालाही कोरोनाची भीती वाटत नाही .शासनाने सामाजिक अंतर ठेवा पन्नास वेळा साबणाने हात धुवा,तोंडाला मास्क लावा,असे अनेक नियम केले तरी जो होगा सो देखा जायेगा असे वातावरण आहे.

लेखक हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक असून जेष्ठ पत्रकार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad