विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक प्रचाराचे ढोल आता थंडावले आहे.निवडणूक जाहीर झाल्यापासून अर्थात दि. ५ नोव्हेंबर पासून तर तीस नोव्हेंबर पर्यंत म्हणजे गेली २४-२५ दिवस विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच गाजली.या निवडणुकीत उमेदवार,संघटना आणि राजकीय पक्षांनी परिपक्वता दाखवून प्रचाराचा आणि आरोप प्रत्यारोपाचा स्तर, अल्पसे अपवाद वगळता, घसरु दिला नाही.या निवडणूकीची वैशिष्ट्ये म्हणजे विधान परिषदेच्या स्थापनेपासून आजतागायत शिक्षक मतदार संघात राजकीय पक्षांनी लुडबुड केली नव्हती.यावेळी पहिल्यांदाच सत्तारूढ आणि विरोधी अशा दोन्ही पक्षांनी उमेदवार उभे केले आहेत. इतर मतदार संघ खुले असतानाही शिक्षक मतदार संघात राजकीय पक्ष घुसल्याने निवडणूक समीकरणे बिघडवून टाकल्याचे आणि संविधान निर्मात्यांच्या हेतूलाच हरताळ फासल्याचे प्रतिपादन माजी आमदार बी. टी. देशमुख यांनी केले आहे. शिक्षक संघटनांचे उमेदवार सभागृहात असतील तर ते एकजुटीने काम करतात असा अनुभव आहे.मग ते कोणत्याही संघटनेचे असले तरी चालेल असे बीटी देशमुख म्हणाले. कधी नव्हे इतके म्हणजे सत्तावीस उमेदवार रिंगणात उभे आहेत व एका उमेदवारांनी माघार घेतली.११ वी नापास आणि बारावी पास असे उमेदवार आहेत. शिक्षकी व्यवसायाशी अजीबात संबंध नसलेले व आपल्या संस्थेतील शिक्षकांना आठ - आठ महिने पगार न देणारे संस्थानिक ही निवडणुकीत उभे आहेत. एकमेव महिला उमेदवार म्हणजे संगीता शिंदे.धडाडीच्या कार्यकर्त्या उभ्या आहेत.विज्युक्टा उमेदवार डॉ.अनिल बोर्डे यांना नुटा ने पाठिंबा दिला आहे.पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नेते माजी आमदार वसंतराव खोटरे यांनी संघटनेत तीस वर्षापासून निष्ठेने काम केलेल्या विकास भास्करराव सावरकर यांना उमेदवारी देऊन निवडणुकीत चांगलाच रंग भरला.आणि आपल्याच पूर्वाश्रमीच्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेला खोटरे यांनी हादरा दिला आहे.
विमा शिस जवळ उमेदवारच नसावा हे संघटनेचे दुर्भाग्य असून ऊमेदवार इम्पोर्टेड करावा लागला अशी नुटाने चे अध्यक्ष डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी टीका केली आहे.माध्यमिक शिक्षक परिषदेला नेहमीच पाठिंबा देणाऱ्या भाजपने यावेळी उमेदवार कशासाठी उभा केला असा सवाल परिषदेने केला आहे.काही संस्थाचालक उमेदवार मताचा जोगवा मागण्यासाठी संस्थाचालकांकडे गेले होते.तुमच्या शाळा-कॉलेजच्या शिक्षकांची मते मिळवून द्या.म्हणणाऱ्या संस्थाचालक उमेदवाराला उत्तर देण्यात आले की, संस्थाचालक आणि शिक्षकयांचे संबंध सासु आणि सुने सारखे असतात शिक्षकांची मते संस्थाचालक उमेदवाराला मिळत नाही हा अनुभव आहे.या मतदारसंघात शिक्षकांनी उभे रहावे किंवा नाही यावरही चांगलेच घमासान झाले.भाजप उमेदवार डॉ. नितीन धांडे हे शिक्षक नसतानाही त्यांनी नावासमोर प्रा.लावल््याने टीका झाली मी हाडाचा एक शिक्षक सुद्धा आहे. शिक्षण संस्थेचा आणि हाडामासाचा शिक्षक सुद्धा आहे शिक्षकांच्या प्रश्नांची शिक्षक या पदाला प्रतिष्ठा हे माझे स्वप्न आहे असे पत्रक त्यांनी काढले.
कारण मीमांसा करणारे पत्रक माजी आमदार बी. टी. देशमुख यांनी काढले त्यातून राजकीय पक्षाच्या उमेदवारांची चांगलीच बिन पाण्याने केली आहे.उपरोध उपहास आणि वक्रोक्ती ने या सजलेले त्यांचे पत्रक जोरदार गाजले.उमेदवार हजर नसेल आणि त्याची निवडणूक बॅनर लागलेले नसेल कोविड एकोणावीस च्या संदर्भात निर्जंतुकीकरणचे नियम पाळल्या जात असतील तर प्रचाराच्या बैठकी घेण्यास हरकत नाही, असा खुलासा निवडणूक यंत्रणेने केला आहे.अशी माहीती देत नुटा चे माजी अध्यक्ष आमदार बी. टी. देशमुख यांनी प्रचार सभा घेतल्या आहेत. राजकीय पक्ष आचारसंहिता भंग करून प्रचार सभा घेत असल्याचा आरोप बी.टी.देशमुखांनी केला होता.आपण ज्या सभा घेत आहोत त्या निवडणूक शयंत्रणेकडून प्रचार सभा म्हणजे काय याची व्याख्या स्पष्ट करून घेत आहोत.आमच्या सभेत उमेदवार नसतात,फलक नसतात आणि सर्व नियमा़ंचे पालन करुन सभा घेतल्या जाते हे नुटा अध्यक्ष डॉ. प्रवीण रघुवंशी त्यांनी स्पष्ट केले,पक्षाचे झेंडे वारंवार बदलविणारे शिक्षक तुम्हाला हवेत काय? कोणताही निवडा पण शिक्षक संघटनेचा नीवडा अशा प्रकारची भूमिका काही नेत्यांनी घेतली आहे.
महाविकास आघाडीत शिक्षक मतदार संघ हा शिवसेनेच्या वाट्याला आला आणि त्यांनी विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांना उमेदवारी दिली.त्यांच्या पाठीशी आता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस जोमाने ऊभी आहे.तर भाजपा ऊमेदवार डॉ. नितीन धांडे यांच्यासाठी भाजपचा एकेक कार्यकर्ता शिक्षक मतदाराच्या घरोघरी जाऊं मताचा जोगवा मागत आहे.उमेदवारांची आपल्या फोटोसह चौकाचौकात गावोगावी असलेली पोस्टरबाजी उपहासाचा विषय झालेली आहे. पाठीत खंजीर खुपसून संस्था ताब्यात घेणाऱ्या ससंस्थाचालकांना धडा शिकवा असे आवाहन करणारे पत्रक देखील जोरदार चर्चेचा विषय आहे.अमक्या टमक्याला दुसऱ्या क्रमांकाची मते देऊ नयेत, असा प्रचारही जोरात सुरू आहे. दुसऱ्या क्रमांकाचे मत मागण्याची खेळी उमेदवारांकडून खेळली जात आहे त्या पासून सावध रहा असा प्रचार आहे.काही उमेदवारांना धडा शिकविण्यासाठी दुसऱ्या क्रमांकाची मते देऊन चुक करू नका असे आवाहन केले जात आहे.पहिल्या पसंतीच्या मतावर पहिल्या फेरीतच त्यांचे घोडे अडवा आणि तिथेच थांबवा.दुसऱ्या पसंतीची मते त्यांना देऊ नका असा प्रचार झाला.
ज्येष्ठ पत्रकार नितीन पखाले यांनी म्हटले आहे की, ही खरंच शिक्षकांची निवडणूक आहे का? ज्यांच्याकडून समाजाला नैतिक मूल्यांची शिकवण मिळावी, अशी अपेक्षा केली जाते, तोच शिक्षक नावाचा घटक साऱ्या नीतीमूल्यांना पायदळी तुडवत अ शिक्षक उमेदवारांसाठी मतांचा जोगवा मागत फिरत असल्याचे चित्र आहे.उमेदवार किमान ‘शिक्षक' असावा ही अपेक्षाअसताना अशिक्षक उमेदवारांची गर्दी झाली आहे.विधान परिषदेत पोहचण्यासाठी सर्व भ्रष्ट,अनैतिक मार्गांचा सर्रास अवलंब सुरू आहे.एरव्ही विधानसभा, लोकसभामधील जे चित्र असते ते शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीनिमित्त बघायला मिळत आहे. शिक्षकांना चांदीच्या ताट, वाट्यांपासून, पाकिटे, पैठणीपर्यंत वाटले जात आहे. पैठणी वाटपासंदर्भात यवतमाळ जिल्ह्यातच गुन्हे सुध्दा दाखल झाले आहे. शिक्षकांच्या समस्या सोडवू म्हणत निवडून आल्यानंतर पुन्हा सहा वर्षांनीच आमदार दर्शन देतात हा अनुभव शिक्षकांना नवा नाहीतरीही शिक्षक या निवडणुकीतील भूलथापांना बळी पडतात याचेच आश्चर्य आहे.एक डिसेंबरला मंगळवारी मतदान होणार असून तीन डिसेंबरला गुरुवारी मतमोजणी होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response