बंजारा समाजाचे धर्मगुरू तथा संत सेवालला महाराज यांचे वंशज महान तपस्वी डाॅ.रामराव महाराज यांच्या वर रविवारी शोकाकुल वातावरणात अखरेचा निरोप देण्यात आला.दरम्यान अखरेचा निरोप देण्यासाठी लाखोचा जनसागर उसळला होता.
या पंतप्रधानांनी घेतली होती रामराव महाराजांची भेट
बंजारा समाजाचे धर्मगुरू डाॅ.रामराव महाराज यांची भेट पंतप्रधान अटल बिहारी वाजपेय, डाॅ.मनमोहनसिंग,नरेंद्र मोदी सह काॅग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भेटी घेतल्या आहे.
बंजारा धर्मगुरू डाॅ.रामराव महाराज यांचा दि.३० ऑक्टोबर रोज शुक्रवारी रात्री अकरा वाजता मुंबई येथील लिलावती रूग्णालयात निधन झाले होते.त्या अनुषंगाने महाराजांवर रविवारी शोकाकुल वातावरणात अखरेचा निरोप देण्यात आला.डाॅ.रामराव महाराज हे संत सेवालला महाराज यांचे वंशज आणि बंजारा समाजाचे धर्मगुरू होते.पोहरादेवी येथे महाराजांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी भक्तांनी लाखोच्या संख्येत गर्दी केली होती.
वनमंत्र्यांच्या पुढाकाराने शासकीय इतमामात अंत्यसंस्काराचा सरकारने घेतला निर्णय राज्याचे वनमंत्री तथा यवतमाळ जिल्हाचे पालकमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे बंजारा समाजाचे धर्मगुरू डाॅ.रामराव महाराज यांच्या वर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावे अशी मागणी केली होती.त्या अनुषंगाने मुख्यमंत्री ठाकरे यांनी डाॅ. रामराव महाराज यांच्या वर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे आदेश दिले.अंत्यसंस्कार दरम्यान उसळली गर्दी
बंजारा समाजाचे धर्मगुरू डाॅ.रामराव महाराज यांचे निधन झाल्याची वार्ता हव्या सारखी देशात पसरल्याने बंजारा समाजातील लाखो भक्त पोहरादेवी च्या दिशेनी निघाल्यामुळे पोहरादेवी येथे प्रचंड जनसागर उसळला होता.
पोलीस विभागाची उडाली तारांबळ
महान तपस्वी डाॅ.रामराव महाराज यांचे निधन झाल्या नंतर पोलीस विभागाने गर्दी न करण्याचे आवाहन केले होते.मात्र रविवारी देशभरातून समाज बांधव पोहरादेवी येथे दाखल झाल्याने प्रचंड गर्दी झाली.त्यामुळे पोलीस विभागाची तारांबळ उडाल्याचे दिसून आले.
अंत्यसंस्काराच्या वेळी लाखो भक्त होते हजर
डाॅ.रामराव महाराज यांच्या वर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पोहरादेवी येथे करण्यात आले.अखरेचा निरोप देण्यासाठी तेलंगणा,कर्नाटक,आध्रा प्रदेश,तामिळनाडू सह आदी राज्यातून अंदाजे दोन लाख भक्त सहभागी झाल्याची माहिती आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response