Breaking

Post Top Ad

रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०

विधान परिषद निवडणूक "आत्मा की आवाज "चे वास्तव

विधान परिषद निवडणूक "आत्मा की आवाज "चे वास्तव
प्रा.न.मा.जोशी ।  ८८०५९४८९५१
माणसाच्या अंतरात्म्याचा आवाज हा त्याच्या जीवनाला ख-या अर्थाने मार्ग दाखवत असतो आणि त्यासाठीच संघटना किंवा संस्थाशी बांधीलकी ठेवणाऱ्यांना आत्म्याशी प्रतारणा करावी लागते असे तत्वज्ञान ओशो रजनीश यांनी सांगितले होते.संत महात्मे किंवा अध्यात्मिक क्षेत्रातील बहुतेक लोक देखील आत्म भान ठेवावे असा उपदेश करत असतात. आत्म्याशी प्रतारणा करू नये असे म्हणतात. भगवान श्रीकृष्णांनीसुद्धा गीतेमध्ये    आत्म्याच्याअमरत्वाचे विवेचन केले आहे. इंदिरा गांधींनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पक्षाने ठरवून दिलेल्या अधिकृतकेलेल्या उमेदवार नीलम संजीव रेड्डी यांच्याविरुद्ध व्ही. व्ही. गिरी यांना उमेदवार उभे केले होते. त्यावेळेस सर्व आमदार- खासदार असलेल्या मतदारांना आवाहन केले होते की पक्ष बाजूला ठेवा,मात्र मतदान करताना आपल्या आत्म्याच्या आवाजाला विचारा. आत्मा की आवाज हा मानवी जीवनातला अतिशय महत्त्वाचा भाग आहे. हे सारे याठिकाणी सांगण्याचे कारण असे की सध्या पदवीधर आणि शिक्षक मतदार विधान परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत. नागपूर,औरंगाबाद, पुणे मतदारसंघात पदवीधर च्या निवडणुका आहेत .पुणे, आणि अमरावती विभागात शिक्षक मतदारसंघात निवडणुका आहेत. या निवडणुकीत राजकीय पक्ष उतरले आहेत.त्यामुळे अनेक नेत्यांची कार्यकर्त्यांची पक्षीय बांधिलकी मुळे मोठी पंचाईत झालेली आहे. 

इच्छा नसूनही आत्म्याच्या आवाजा विरुद्ध त्यांना काम करावे लागत आहे.अमरावती शिक्षक मतदार संघात. महाविकास आघाडीने विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे तर भाजपने डॉक्टर धांडे यांना उतरविले आहे.पश्चीम माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव खोटरे यांनी विकास सावरकर यांना उतरवले आहे तर व माध्यमिक शिक्षक संघाने देखील उमेदवार मैदानात सोडले आहे. माध्यमिक शिक्षक परिषदही मैदानात असून काळपांडे त्यांचे उमेदवार आहेत. महिला उमेदवारांमध्ये एकमेव संगीता शिंदे जोरदार टक्कर देत आहे. विजूक्टा चे नुटा समर्थीत उमेदवार डॉक्टर अविनाश बोर्डे हे उभे आहेत. या निवडणुकीची गंमत म्हणजे गेल्या पदवीधर मतदार संघातील उमेदवार डॉक्टर रणजीत पाटील डॉक्टर दीपक धोटे संजय खोडके डॉ. अविनाश चौधरी हे कुणाकडे आहेत हा जोरदार चर्चेचा विषय आहे. डॉक्टर रणजीत पाटील पाटील भाजपच्या तिकिटावर निवडून आले सध्या काँग्रेसमध्ये असलेले संजय खोडके, प्रहार संघटनेचे नेते बच्चुभाऊ कडू यांचे सहकारी शिक्षण क्षेत्रातील, विद्यापीठ शिक्षण क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल डॉक्टर दीपक धोटे, मधुमेह तज्ञ डॉक्टर अविनाश चौधरी या पदवीधर मतदार संघात उभे होते. डॉक्टर रणजीत पाटील यांनी बाजी मारली होती.


रणजीत देशमुखांनी बी. टी. देशमुख यांचा पराभव केल्यानंतर  बी. टी. देशमुख अलिप्त झाले. मात्र त्यांनी या खेपेला परिस्थिती वेगळी असल्यामुळे अविनाश बोर्डे यांना 'नुटा'चा पाठिंबा जाहीर केला आणि त्या संबंधीची आपली भूमिका सडेतोडपणे मांडली आहे. वसंतराव खोटरे भाजपचे नेते असले तरी शिक्षकांच्या हितासाठी शिक्षकच उमेदवार असावा म्हणून त्यांच्या पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने पूर्ण ताकदीनिशी विकास सावरकर या उमेदवारासाठी लढत आहेत. भाजपने शिक्षक परिषदेशी जणू काही फारकत घेत आपला स्वतंत्र उमेदवार उभा केला आहे. म्हणजे भाजपच्या मतांचे विभाजन शिक्षक परिषद आणि भाजपात होणार आहे. भाजपाचे नेते डॉ. अनिल बोंडे त्यांच्या भगिनी स्वतंत्रपणे लढत आहेत.मात्र त्यांच्या लढण्याची आपला संबंध नाही असा खुलासा डॉक्टर बोंडे यांना करावा लागला आहे. दीपक धोटे यांनी म्हटले आहे की आमची विचारसरणी काहीही असली तरी पक्षाच्या बांधिलकी मुळे आम्ही पक्षाच्या उमेदवारासाठी काम करणार आहोत. श्रीकांत देशपांडे हे आघाडीचे शिवसेनेचे नेते आहेत. आमची प्रहार संघटना महा विकिसआघाडी मध्ये सहभागी आहे. बच्चू कडू हे मंत्री आहेत. त्यामुळे कोणत्याही स्थितीत आम्ही आमचा पाठिंबा आणि कार्य श्रीकांत देशपांडे यांच्यासाठी करीत आहोत.संजय खोडके एक अत्यंत प्रतिभावंत अभ्यासू आणि लढाऊ नेतृत्व आहे ते म्हणाले की पक्षाच्या बांधिलकी मुळे या शिक्षक मतदार संघात श्रीकांत देशपांडे यांच्यासाठी काम करण्यास बाध्य आहोत. रणजीत पाटील हे तर बच्चे भाजप नेते. त्यामुळे त्यांना देखील भाजपासाठी काम करणे भाग आहे. अत्यंत मिळवू स्वभावाचे डॉक्टर रणजीत पाटील यांना पुढे विधान परिषदेच्या अमरावती विधान अमरावती विभागातून पदवीधर संघातून निवडणूक  लढावी लागणार असल्यामुळे त्यांना श्रीकांत देशपांडे यांच्यासाठी जोर लावून काम करणे भाग आहे.


डॉ. अविनाश चौधरी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूनही तो न झाल्यामुळे डॉ.चौधरींची प्रक्रिया समजली नाही.अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघात गेल्या खेपेला त्यांनी जोरदार वातावरण निर्मिती केली होती.प्रा. बी. टी. देशमुखांची एक तरी सभा पाच जिल्ह्यांपैकी एखाद्या जिल्ह्यात झाली पाहिजे ही नुटा कार्यकर्त्यांची अपेक्षा इच्छा होती. खुद्द अविनाश बोर्डे यांनी बीटी देशमुखांना आग्रह करून यवतमाळ मध्ये शनिवारी बैठक आयोजित केली.या निवडणुकीतील सर्व उमेदवारांचा मतदारांचा राजकीय नेत्यांच्या विचारांचा एकत्रित विचार केला तर एक गोष्ट दिसून येते ती म्हणजे राजकारणात असलेल्या किंवा संघटनेशी बांधिलकी असलेल्या व्यक्तींना आपल्या आत्म्याशी प्रतारणा करावी लागते. त्यांचा आत्मा सांगतो एक आणि त्यांना वागावे लागते दुसरे.आत्म्याशी प्रतारणा करणे ही केवढी वेदनादायी दुःखद बाब असते हे जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे अशी असते पण त्याला इलाज नाही.

मुझे मेरे हाल पे छोड दो 

मुझे तुमसे कुछ भी ना चाहिये 

मै येभूल जाऊंगा जिंदगी !

हे म्हणयाची सोय राजकीय पक्षांच्या सभासदां जवळ नसते .पक्षाचे नेते जे ठरवतात ते त्यांना करावे लागते.एखादा अपवाद म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे  काँग्रेस पक्षाने अधिकृत उमेदवार असलेल्या नीलम संजीव रेड्डी यांना पराभव पहावा लागला. आवाज इंदिरा गांधींच्या बाजूने असल्यामुळे व्ही. व्ही. गिरी निवडून आले होते. तो एक अपवाद म्हणता येईल विधान परिषद शिक्षक मतदार संघात चार दिवसांवर आली असताना आत्मा की आवाज चा विषय बाकी जोरदार चर्चेत आलेला आहे एवढे मात्र खरे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad