Breaking

Post Top Ad

गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०२०

जिल्ह्यात ह्या व्यवसायिकांना लाॅकडाऊन मधून वगळलं

जिल्ह्यात ह्या व्यवसायिकांना लाॅकडाऊन मधून वगळलं
यवतमाळ : राज्याचे मुख्य सचिव यांच्या अधिसुचनेनुसार पुन:श्च प्रारंभ अभियानांतर्गत निर्बंध शिथील करणे व ताळेबंदी टप्प्याटप्प्याने उठविणे अंतर्गत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. सदर मार्गदर्शक सूचना दि. ३० नोव्हेंबर च्या मध्यरात्रीपर्यंत अंमलात राहणार आहेत. यवतमाळ जिल्ह्याकरीता ह्यापूर्वी निर्गमित करण्यात मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आलेल्या आहेत त्या तशाच लागू राहतील व मुख्य सचिव यांच्या आदेशानुसार यवतमाळ जिल्ह्याकरीता खालीलप्रमाणे अतिरिक्त मार्गदर्शक सूचना लागू करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आदेशात नमुद केले आहे.

दि.५ नोव्हेंबरपासून स्विमिंग पुल्स फक्त राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूला सरावाकरीता सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे. तसेच योग वर्ग / संस्था, सर्व इनडोअर खेळ जसे की, बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॅश, इनडोअर शुटींग रेन्जेंस इत्यादी खेळास सामाजिक अंतर आणि मोठ्या प्रमाणात स्वच्छता राखून मुभा देण्यात येत आहे. सिनेमा हॉल्स / थिएटर / मल्टीप्लेक्स/ ड्रामा थिएटर्स एकूण क्षमतेच्या ५० टक्के बैठक व्यवस्थेच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे. परंतु सिनेमा हॉल्स, थिएटर,मल्टीप्लेक्स,ड्रामा थिएटर्स मध्ये कोणत्याही खाण्यायोग्य वस्तुंना विकण्याची किंवा घेवून जाण्याची परवानगी राहणार नाही.

सदर आदेश यवतमाळ जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रे वगळता उर्वरित ग्रामीण व शहरी क्षेत्रास आदेशाचे दिनांकापासून लागू राहतील. सदरील आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह हे साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ व इतर संबंधीत कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल. तसेच यापूर्वी निर्गमित केलेल्या आदेशानुसार दंडात्मक कार्यवाही सुध्दा करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad