यवतमाळ: दिवाळीच्या मध्यरात्री दरम्यान जगदंबा इंजिनिअरिंग काॅलेज जवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन त्यात यवतमाळ येथील दोन युवक जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे.हा अपघात शनिवार मध्यरात्री दरम्यान झाला.शुभम गादेवार, प्रविण शिरभाते असे मृतकांचे नाव असून पंकज शाह, केतन भानोडे हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहे.
घरातील मंडळी दिवाळीचा उत्सव साजरा करण्याची तयारी सुरू असताना कुटूंब प्रमुख जग सोडून गेल्याची वार्ता घरातील मंडळीना समजते तेव्हा घरात काही क्षणात केवळ अंधार पसरला.आज सगळीकडे दिवाळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होईल मात्र मृतक शुभम आणि प्रविण यांच्या परिवारात दिवाळी साजरी करण्यापुर्वीच काळाने झडप घातल्याने अंधकार पसरला आहे.शुक्रवारी रात्री मृतक शुभम प्रविण शिरभाते आणि जखमी पंकज शाह आणि केतन भानोडे हे चौघे जण किन्ही जवळील धाब्यावर जेवन करण्यासाठी केतन ऑक्टिव्हा क्रमांक एम.एच.२९ बीसी ५२३७ या वाहनाने गेले होते.परतीच्या मार्गावर असताना जगदंबा इंजिनिअरिंग काॅलेज जवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने बाजुच्या पुल च्या टोकाला जबरदस्त धडक दिली.तद्नंतर वाहन उजव्या बाजूला घेण्याचा प्रत्यन केला असता गाडी फलटी झाली.यात दोन जण जागीच ठार तर दोन गंभीर जखमी झाले आहे.Post Top Ad
शनिवार, १४ नोव्हेंबर, २०२०
यवतमाळ नजिक अपघातात दोन जण जागीच ठार
Tags
महाराष्ट्र#
यवतमाळ#
Share This
About TeamM24
यवतमाळ
लेबल:
महाराष्ट्र,
यवतमाळ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Post Top Ad
Author Details
मराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response