यवतमाळ : बुधवारी चोवीस तासात जिल्ह्यात १२० जण नव्याने पॉझिटीव्ह आले असून एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला. मृतकामध्ये घाटंजी तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या ४० जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
आतापर्यंत एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ११२३५ झाली आहे. २४ तासात ४० जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या १०४४२ आहे. तर जिल्ह्यात एकुण ३६८ मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत १०८३०६ नमुने पाठविले असून यापैकी १०६९९८ प्राप्त तर १३०८ अप्राप्त आहेत. तसेच ९५७६३ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी एकुण १९०५ रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी १२० जण नव्याने पॉझिटीव्ह तर १७८५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. जिल्ह्यात सद्यस्थितीत ४२५ 'ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह' आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response