वादग्रस्त अभिनेत्री कंगणा राणावत हिच्या वक्ताव्यानंतर राज्यात प्रचंड वाद पेटला.याला नंतर राजकीय स्वरूपही आले.त्यानंतर कंगणा लगेच केंद्रीय गृह मंत्रालयाने वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवली.सध्या देशात २०८८८ व्हीआयपींना सुरक्षेसाठी तब्बल ५६९४४ जवान तैनात आहे.याचा अर्थ असा की, एका व्हीआयपीच्या सुरक्षेसाठी तीन जवान,तर सर्वसामान्य नागरिकांसाठी संपुर्ण देशात १९.२६ लाख पोलीस आहेत.म्हणजे ६६६ लोकांमागे एक जवान.
दि.११ एप्रिल २०१७ रोजी खासदार कमला पाटले यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता.की, व्हीआयपी लोक म्हणजे कोण? याची नेमकी सरकारी व्याख्या काय आहे? दरम्यान तात्कालीन गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी उत्तर दिले होते की, व्हीआयपी किंवा व्हीव्हीआयपी अशी कोणतीही अधिकृत व्याख्या नाही.तरीही देशात व्हीआयपी संस्कृती सतत वाढत आहे.विशेष म्हणजे कोणाला सुरक्षा द्यायची यासाठी प्रत्येक राज्यात समिती आहे.मात्र यामध्ये नेहमी राजकीय हस्तक्षेप होत असल्याने व्हीआयपी ही व्याख्या पुढे आली असे अनेकांना वाटते.
कशी वाढली व्हीआयपी सुरक्षा
आपल्या देशात २०१५ मध्ये २५७ व्यक्तींना सरकारने सुरक्षा दिली होती.त्याची संख्या आता डबल म्हणजे ४५० एवढी झाली आहे.४५० जणांच्या सुरक्षेवर केंद्रीय दलाचे पाच हजारापेक्षा जास्त जवान तैनात आहे.म्हणजे एक व्हीआयपीला १० जवान सुरक्षा देतात.
सुरक्षा कोणत्या वर्षी किती वाढली
सन झेड झेड वाय एक्स एकुण
२०१५ ३४ ६६ १०९ ४८ २५७
२०१६ ३१ ६९ १३६ ६८ २९२
२०१७ २६ ५८ ११६ ६८ २९८
२०१८ - - - - ३००
२०२० - - - - ४५०
विशेष म्हणजे यात सुरक्षेचा वापर सुटकेस उचलण्यासाठी आणि टोलनाक्या वरील टोल वाचविण्यासाठी करित असल्याचे दिसून येते.सुरक्षा बाबत कोणत्याच सरकारने आता पर्यंत उत्तर दिलेले नाही.मग ते खासदारांचे प्रश्न अथवा सुरक्षा असेल किंवा दरवेळेस अधिवेशनात उपस्थितीत केलेल्या महत्वाच्या प्रश्न म्हणजे देशात व्हीआयपी लोकांच्या सुरक्षेवर किती रूपये खर्च करण्यात आला.मात्र केंद्रीय गृहमंत्रालयाचे यावर एकच उत्तर असतात ते म्हणजे सुरक्षेवर होणाऱ्या खर्चाचा संबंध आहे.तो योग्यपणे ठरवणे कठीण आहे.सुरक्षा व गोपनीयतेच्या दृष्टीने माहिती देऊ शकत नाही.आता ही गोपनीय म्हणजे काय?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response