Breaking

Post Top Ad

शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०२०

'झी२४तास आणि राजीनामा'

'झी२४तास आणि राजीनामा'
मुंबई(महाराष्ट्र२४टिम) इलेक्ट्रॉनिक मिडीया म्हणजे राजकारणी लोकांच्या हाताचे बाहूले अशाच काही तरी समज सर्व सामान्य नागरिकांमध्ये असल्याची प्रतिक्रिया सोशल मिडीयावर अनेक वेळा उमटत असतात.मात्र मंत्र्यालयातील अनेक भष्टाचारा विरोधात बेधडक आवाज उठवून भष्टाचार बाहेर काढणारा अभ्यासू पत्रकार आशिष जाधव यांनी गुरूवारी अचानक 'झी२४तास'च्या संपादक पदाचा राजीनामा दिल्याने विविध चर्चेला उधान आले आहे.


आशिष जाधव यांची पत्रकारिता ही प्रिंट मिडीयातून सुरू झाली.लोकसत्ता,लोकमत त्यानंतर आयबीएन लोकमत, महाराष्ट्र नंबर वन आणि अडीच वर्षा आधी 'झी२४तास'च्या संपादक म्हणुन जवाबदारी स्विकारली. सुरूवातीला आशिष जाधव यांनी झी२४तास च्या संपादक म्हणुन जवाबदारी हाती घेतल्या नंतर जाधव संपादक म्हणुन यशस्वी होईल अशा कोणाला ही वाटत नव्हतं.मात्र काही महिन्यात आशिष जाधव यांनी आपला 'रोखठोक'बाणा दाखवून झी२४तास ला एक पाऊल पुढे नेलं.कमी वेळात 'रोखठोक'च्या माध्यमातून आशिष जाधव यांचा आवाज राज्यातील नागरिकांच्या घराघरात घुमू लागला. 


झी२४तास ला रोखठोक बोलणारे संपादक जमत नाही

झी२४तास हा चॅनल कोणाचा आहे.हे सांगण्याची गरज नाही.'झी२४तास'ला या आधी मंदार परब,डाॅ.उदय निरगुडकर आणि आशिष जाधव या तिघांनी रात्रीच अचानक राजीनामा दिला आहे.डाॅ. उदय निरगुडकर यांनी २०१७ मध्ये तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखात घेतली होती.त्या मुलाखातीत निरगुडकर यांनी फडणवीस यांना जनतेच्या प्रश्नावर सळोकी पळो करून सोडले होते.तद्नंतर रात्री तडकाफडकी निरगुडकर यांनी संपादक पदाचा राजीनामा दिला होता. दि.२५ नोव्हेंबर रोजी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची आशिष जाधव यांनी झी२४ तास वर 'कॅफे २४ तास' अशी जबरदस्त मुलाखत घेतली होती.बहुतेक ही मुलाखात भाजपला खटकल्याने झी२४तास च्या मालका कडे भाजप नेत्यांनी जाहीर नाराजी बोलून दाखवल्याने निलेश खरे यांना झी२४तास मध्ये घेण्यात आले.त्यामुळे आशिष जाधव यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.

 

आशिष जाधव यांनी राजीनामा दिल्या नंतर केलेलं टिव्ट 

झी२४तास च्या व्यासपीठावरून 'रोखठोक' या कार्यक्रमातून आशिष जाधव हा दररोज नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सरकार दरबारी मांडुन सरकारचे लक्ष वेधत सत्ताधाऱ्यांना रोखठोक प्रश्न विचारून घाम फोडण्याचा काम करित असल्याने अल्पवधी काळात कोट्यावधी नागरिकांच्या गळ्यातील ताईत बनला.मात्र गुरूवारी दि.२६ नोव्हेंबर ला रात्री अचानक आशिष जाधव यांनी संपादक पदाचा राजीनामा दिल्याची माहिती सोशल मिडीयावर दिल्याने इलेक्ट्रॉनिक मिडीया मध्ये मोठी खळबळ उडाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad