संदेश करायचा स्पर्धा परीक्षेची तयारी
संदेश चे वडील शेतकरी असून त्याने यवतमाळच्या महाविद्यालय मधून त्याने अभियांत्रिकी ( इलेक्ट्रिक) शिक्षण पूर्ण केले होते. सद्या तो स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता.मात्र लॉकडाऊन पासून तो सद्या घरी आला होता.शेतातील जवाबदारी पूर्ण करून वडिलांना मदतही करायचा.
गुरुवारी एका शेतकरी पुत्राने आत्महत्या करून आपले जीवन संपविल्याची घटना घडल्याची शाई वाळते न वाळत पुन्हा याच परिसरातील एका उमद्या तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याने महागाव तालुका हादरला आहे.गुरुवारी (ता.१९) आत्महत्या करणाऱ्या सूरज नरवाडे आणि आज शुक्रवार ता.(२०) ला आत्महत्या करून जीवन संपविणाऱ्या संदेश हे दोघे जिवलग मित्र असल्याचे समजते.मात्र या दोघांनी आपल्या मरणाला का कवटाळले हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response