यवतमाळ: वनविभागा अंतर्गत हिवरी वन परीक्षेञातील नाकापार्डी वर्तुळात,तत्कालीन वनपाल शेखर साठे यांनी मजुरांच्या मोठा अपहार केल्याची तक्रार रोजंदारी वन मजुर चिंतामण नारायण येसनसुरे यांनी वनमंत्र्यांच्या घरासमोर प्राणत्याग आंदोलन करण्याच्या इशारा दिल्याने वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे. मुख्य वनसंरक्षक यांचे कडे नुकतीच केली होती. त्या अनुषंगाने याची गंभीर दखल घेत मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांनी उप वन संरक्षक ( प्रादेशिक) यांना तत्कालीन वनपाल शेखर साठे यांच्या चौकशीचे आदेश दिले आहे. त्यामुळे हिवरी वनपरीक्षेत्रात सन्नाटा पसरला आहे.
सालोड, घाटाना, बारडतांडा, लोणी आदी बिट मध्ये वनीकरणाच्या संरक्षणासाठी रोजंदारी वन मजुर नेमले आहेत. वन विभागाच्या नियमानुसार मजुरांना रक्त, आणि घामाचा मोबदला न देता केवळ नाममात्र २०० रुपयावर बोळवण केली जात होती. रोजंदारी वन मजुर नामदेव चंपत राऊत, चिंतामण नारायण येसनसुरे, शंकर शेषेराव पवार, सज्जन चंपत गायकवाड,संकेत विनोद चोले, गणेश पुनाजी फेंडर यांना मागील पाच सहा महिन्यापासून मजुरची रक्कम मिळाली नाही. शिवाय मुख्य तक्रारकर्ता चिंतामण नारायण येसनसुरे यांना तब्बल सोळा महिन्यापासुन वंचित ठेवण्याचे पाप हिवरी वन विभागाने केले.
चिंतामण ची लाडाची लेक अत्यंत सिरीयस असुन अंथरुणावर निश्चल पडलेली आहे, पैशा अभावी पोटगोळ्यावर उपचार करणे शक्य नसल्याने पती-पत्नी छाती बडवुन लेकीच्या खाटेजवळ रडत बसले आहेत.नाका तोंडात पाणी गेल्यानंतर, वंचित, शोषित, पिडीत, वनमजुर चिंतामण नारायण येसनसुरे यांनी वनमंत्र्यांच्या घरावर तरी थाप मारली, तक्रार दिली, यवतमाळ विभागाचे प्रादेशिक वनसंरक्षक यांनी या वन मजुराचे अश्रु पुसत, विनाविलंब तत्कालीन वनपाल शेखर साठे यांच्या चौकशीचे आदेश दिले. तक्रारीत नमुद तमाम बाबीवर आवश्यक चौकशी करुन कडक कारवाई करण्याचे आदेश उपवनसंरक्षक यवतमाळ यांना दिले आहे. दोषी वनपाल आणि नाकापार्डी वर्तुळातील वन कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास, आणि सोळा महिन्याची मजुरी न दिल्यास,अत्यंत गंभीर असलेल्या आजारी मुलीसह वनमंत्र्यांच्या घरासमोर प्राणत्याग आंदोलन करण्याचा इशारा हिवरी वनपरीक्षेत्रातील कक्ष क्र.२७६ सालोडचे रोजंदारी वन मजुर चिंतामण नारायण येसनसुरे यांनी दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response