Breaking

Post Top Ad

मंगळवार, १ डिसेंबर, २०२०

७० टक्के मतदान: शिक्षक मतदार निवडणूक

७० टक्के मतदान: शिक्षक मतदार निवडणूक
मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी करताना जिल्हाधिकारी सिंह
यवतमाळ
: अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता यवतमाळ जिल्ह्यात सायंकाळी ४ वाजेपर्यंत एकूण ७०:३३ टक्के मतदान झाले. यात ७०:४० टक्के पुरुषांनी तर ७०:११ टक्के महिलांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

अमरावती विभागात असे झाले मतदान


जिल्ह्यात एकूण ५६४९ पुरुष मतदार तर १८१० महिला मतदार असे एकूण ७४५९ मतदार आहेत.  तसेच जिल्ह्यात एकूण दिव्यांग मतदारांची संख्या ४२ आहे. यात ३२ पुरुष मतदार आणि १० महिला मतदारांचा समावेश आहे. यापैकी सायंकाळी ४ वाजेपर्यंत ३९७७ पुरुषांनी आणि १२६९ महिला मतदारांनी निवडणुकीचा हक्क बजावला. तर दिव्यांग मतदारांमध्ये ३२ पुरुषांपैकी २७ आणि १० महिलांपैकी ६ महिला मतदारांनी मतदान केले.


यवतमाळ जिल्ह्यातील १९ मतदान केंद्रावर सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. कोविड सुरक्षा नियमांचे पालन करून ही  निवडणूक होत आहे. मतदानाची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. तत्पूर्वी निवडणूक निरीक्षक आनंद लिमये आणि जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी बचत भवन येथील तसेच तहसील कार्यालयातील मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad