यश परमेश्वर नांदे वय ७ वर्षे असे ट्रॅक्टरच्या धडकेत ठार झालेल्या मुलांचे नाव आहे.दरम्यान या घटनेची फिर्याद चेनत सुखदेव पारधी यांनी पोलिसात दिल्याने ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.मृतकची आई नामे पुजा परमेश्वर नांदे हि दिवाळीला पुण्यावरून माहेरी पावणपणा आली होती.
सोमवारी साडे दहा वाजता दरम्यान मृतक हा चेतन पारधी याला नास्ता करण्यासाठी बोलविण्याठी मेन रस्त्याने जात असताना विरूद्ध दिशेने येणारा ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.२९ ए.सी.३०२३ च्या चालकाने आपले वाहन निष्काळजीपणे चालवून सात वर्षाच्या मृतक यश ला जोरदार धडक दिल्याने यात तो गंभीर जखमी झाला.त्याच अवस्थेत मृतक यश ला आर्णी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले.मात्र त्याला डाॅक्टरांनी मृत्यू घोषीत केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response