एका आठवड्याच्या आत संबंधित नायब तहसीलदार, तलाठी, पोलिस पाटील आणि ग्रामसेवक यांनी सदर कुटुंबियांकडून सर्व कागदपत्रे तयार करून घ्यावीत. यात कोणतीही चालढकल करू नये. तसेच काही कुटुंबांना शेतात पंप, जोडधंदा म्हणून गाई-म्हशी वाटप, शेटीवाटप आदींचा लाभ द्यावा. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत सुध्दा सदर कुटुंबाना लाभ देण्याचे नियोजन करावे, अशा सुचना त्यांनी केल्या.
यावेळी आर्णी तालुक्यातील माळेगाव येथील कैलास पवार यांच्या कुटुंबियांना नरेगा अंतर्गत विहिरीचा लाभ, आर्णी तालुक्यातील कु-हा येथील अक्षय पुसनाके यांच्या कुटुंबियांना विहिर, मारेगाव तालुक्यातील टाकळी येथील विठ्ठल जुमनाके यांच्या कुटुंबियांना विहिर, केळापूर तालुक्यातील अर्ली येथील संतोष बोरकर यांच्या कुटुंबियांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ, घाटंजी तालुक्यातील आंबेझरी येथील विजय कोटनाके यांच्या कुटुंबियांना शेळीवाटप, झरीजामणी तालुक्यातील दाभाडी येथील शरद आत्राम यांच्या कुटुंबियांना विहिर व शेळीपालन, नेर तालुक्यातील सोनवाढोणा येथील राजेश राठोड यांच्या कुटुंबियांना विहिर व शेतीला कुंपण, नेर तालुक्यातील पिंपरी कलगा येथील राजेश तुपटकर यांच्या कुटुंबियांना विहिर आणि दिग्रस येथील रामनगरातील शत्रृघ्न शेंगर यांच्या कुटुंबियांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याचे प्रस्तावित केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response