Breaking

Post Top Ad

सोमवार, २१ डिसेंबर, २०२०

भटक्या, विमुक्तांच्या, भावनांचा दस्तावेज!

भटक्या, विमुक्तांच्या, भावनांचा दस्तावेज!
पंजाब चव्हाण यांची 'याडी' 

“याडी” म्हणजे आई.आईची थोरवी  शब्दात वर्णीली जात नसली तरी कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न अगणित लोकांनी केला आहे.आई थोर तुझे उपकार,स्वामी तीन्ही जागांचा आई विना भिकारी, आई म्हणून कोणी आईस हाक मारी,अशा अनेक कवितां मधून आईची माहिती सांगणारे साहित्यिक होऊन गेले.शेगावच्या कवी वैभव भारंबे  यांनी म्हटले आहे की, जिच्या उदरातून आपला जन्म झालेला आहे, प्रत्येकाच्या जीवनातील पहिला गुरु म्हणजे आपली आई,म्हणतात ना या जगात देव प्रत्येकाजवळ जाऊन त्याची समस्या सोडवू शकत नाही, म्हणून त्याने आपल्याला आई दिलेली असते.

समुद्राची शाई आणि आकाशाचा कागदव जंगलात तील सर्व वृक्षांची लेखणी करून सुद्धा तिचे उपकार मांडल्या जाऊ शकत नाही.'आ' म्हणजे आकाश आणि 'ई' म्हणजे ईश्र्वर, आकाश आणि ईश्वराचे एकत्रीकरण असलेला शब्द म्हणजे आई होय.मॅक्झीम गार्की ची कामगार चळवळीतीलसक्रिय "द मदर" ही कादंबरी असेल, वा श्याम ला संस्कारक्षम वळण लावणारी साने गुरुजींनी साकारलेली "श्यामची आई". याच्यासारखंच गोरगणात  जन्मलेल्या लेखक,कवी साहित्यिक पुसद चे पंजाब चव्हाण

यांना संघर्षात जिद्दीने लढायला शिकवणारी "याडी".अर्थात आई ही कलाकृती(आत्मकथन) म्हणजे भटक्या, विमुक्त, आदिवासी, बहुजन समाजातील तरुणांना मनातील भावना व्यक्त करण्याची प्रातिनिधिक अजरामर दस्तावेज आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. नानी पालखीवाला यांनीएम सी छागला यांच्या "रोझेस इन डिसेंबर" या आत्मचरित्राचे परीक्षण करताना म्हटले आहे की,छागला यांच्या विविधांगी जीवनातील काही  पैलू अनेक वाचकांना माहीत असतील पण त्यांचे हे आत्मकथन वाचल्यानंतर एखादा समर्थ कलावंत जीवनाच्या  रंगमंचावर कीती वेगवेगळ्या भूमिका  पार पाडू शकतो याची कल्पना येऊन वाचक थक्क झाल्या शिवाय राहणार नाही.दुसऱ्या कोणत्याही करण्यासाठी नसली तरी निदान या एका कारणासाठी छागला यांनी आपली जीवन कथा सांगायलाच हवी होती.आत्मचरित्राच्या लेखकाचे व्यक्तित्व किती सुसंस्कृत आणि सहृदय आहे याचा पानोपानी परिचय येतो.हेच शब्द पंजाब चव्हाण यांच्या 'याडी'  संदर्भात लागू होतात.लेखक किशोर आत्माराम नाईक यांनी पंजाब चव्हाण यांच्या 'याडी' या आत्मकथनात्मक ग्रंथाबद्दल लिहिले आहे की,स्वातंत्रोत्तर काळात बहूजन समाजाला शिक्षणाची दारे खुली झाली.महात्मा फुलेंनी चेतविल्या ज्योतीने मनात साचलेल्या आक्रोशाला बहुजनांच्या विचारांनी समाजात वणवा पेटवून दिला. गोर समाजात आत्मचरित्र लिहीणारे तसे कमीच.

प्रा.न.मा.जोशी । ८८०५९४८९५१

सुरुवात केली ती...तांडा..लिहून आत्माराम राठोड यांनी.धावजी राठोड यांच...गोठाण..रामचंद याचं लमाण... तर नामदेव चव्हाण यांच लदनी, हरिभाऊ राठोड,इत्यादी पण कमीच. यांच्यासारखंच साहित्यात प्रसिद्ध झालं ते पंजाब चव्हाण यांचं आत्मचरित्र म्हणजे....याडी श्री. पंजाब चव्हाण यांनी सुरुवातीलाच बालपणीच्या गोड कडू आठवणींना उजाळा दिला आहे.. घरची परिस्थिती सांगताना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असताना आईने शिक्षणासाठी दिलेला पाठिंबा...वडीलांनी दिलेली शाबासकीची थाप.... आणि लेखकाला भेडसावत गेलेली संकटाची मालिका.. वाचताना पुस्तक आपलसं करुन घेत.अंगावर शाळेचा गणवेश सुद्धा फाटलेला असताना लेखकाची शिक्षणाची जिद्द, चिकाटी प्रकर्षाने जाणवते. एक वेळ उपाशी पोटी राहून लेखक आणि  तीन भावंडांची पोटाची भूक भागविण्यासाठी आईला करावी लागणारी रोजमजूरी. सोबत कामकरणाऱ्या महीलांकडून कोर-चतकोर भाकरीचा तुकडा घेवून आपल्या पिल्लांना भरवणारी.....याडी... चिरकाल स्मरणात राहते. अशा कठीण परिस्थितीत खाणारी लोकं लेखकाच्या कुटूंबात जास्त असल्यामुळे भिका काकाचा वेगळा संसार थाटण्याचा बेत. 

गोर साहित्यात "याडी" साहित्याने एक स्वतंत्र ठसा उमटविला आहे. भिमणीपुत्र मोहन नाईक यांचे पुस्तक लिहीण्यासाठीचे पाठबळ आणि त्यांचीच प्रस्तावना वाचनीय  आहे. (पंजाब चव्हाण संपर्क:९४२१७७४३७२)

आई-वडीलांची मनावर दगड ठेवून दिलेली संमती आणि तांडा पंचांनी केलेला बटवारा. तांडा पद्धतीनूसार आई-वडील लहान मुलांच्या वाटणीत जातात परंतु सारं घ्या पण आई-बाप मला द्या....म्हणनारा लालसिंग (लेखकांचे वडील) वाचतांना प्रत्यक्ष नजरेसमोर उभा राहतो. तांडा....नऊ दिवसांचा उत्सव...दसराव- पुर्वजांची पुजा....दिवाळी चा मेरा मागणे....एक महिना लेंगी गात  चालणारा होळी चा सण तांडा जोशात साजरा करतो... समण, नसाब यात तांड्यातील विविध मतप्रवाह.....यासर्व घडामोडीत संसाराची ठिगळं जोडत याडी  स्वत: अर्धापोटी राहून आनंदात पिलाला भरवायची... शालेय जीवनात रविवारचा बाजार, आलूबोंडा आणि याडीच रडणं...याच बोलकं उदाहरण मांडलेल आहे.शालेय जिवनात वसतिगृहातील मंजुळा मावशी, नाना नोकर,  नारायण..वर्ग मित्र, प्रकाश भांगरे प्रकरण, जिवंत साप पकडणे, पैशाअभावी परिक्षेपासून वंचित राहणारा हंजारी, भूत लागणे, सिताला भेटण्यासाठी जाताना अंधाऱ्या रात्रीचा प्रसंग...दरवर्षी उतिर्ण झाल्यावर अक्षर ओळख नसलेली पण गुणपत्रिका आवर्जून बघणारी याडी...अंगावर फाटके कपडे असताना जुनं पितळी गुंड घेणारी याडी....पोटच्या गोळ्याला पोटभर अन्न मिळाव, शिकून मोठं व्हाव म्हणून मोलमजुरी करणारी याडी.. 

प्रसंगी चक्कीत सांडलेल्या पिठाच्या भाकरी करून साऱ्यांच्या पोटाची आग विझवणारी याडी...म्हाताऱ्या सासु सासऱ्याला पहीली भाकर वाढणारी याडी.....सारखी  नजरेसमोर जाणवत राहते. अचानक सावरगाव ला गेल्यावर मामाच्या सिता नावांच्या मुलीशी ओळख आणि त्यानंतर तिच्यासोबतच झालेली सोयरीक. जी पुढे पाच वर्षे परिस्थिती मुळें तशीच राहिली... कृषीझाल्यावर मामानी लग्नासाठी केलेली घाई आणि लग्नानंतर नविन नवलेरी-वेतडू (नवरी-नवरदेव) यांनी पैसे नसल्यामुळे पायी केलेला प्रवास, घरातला उपाशीपोटी केलेला नवा संसार डोळ्यांच्या कडा ओलावल्या शिवाय राहत नाही. साकोलीला ग्रामसेवक म्हणून नेमणूक ते गट विकास अधिकारी म्हणून पदोन्नती, याकाळात आपुलकीच्या लोकांकडून मिळालेला आधार, सुरुवातीच्या काळात परिस्थिती मुळे जिवनाची झालेली ससेहोलपट, झिपरीबाई चुलत आत्याच्या मुलीसोबत बसस्थानकावर झालेली भेट आणि तिच्या मनाचा मोठेपणा, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या सोबतची भेट, बंजारा कर्मचारी सेवा संस्थेची स्थापना, आनंदवन मध्ये बाबा आमटे सोबतची चर्चा यासर्व घटना लेखकाची जिवनातील तगमग आणि वाचकांची उत्कंठा वाढवतात.भूदान चळवळ..व नंतरच्या काळात अनेक व्यक्ती, संघटना आणि चळवळीशी लेखकाचा संपर्क आला. वसंतराव नाईक  आणि    सुधाकरराव नाईक यांची प्रेरणा जिवनाचे पाथेय ठरले.

लेखक हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक असून जेष्ठ पत्रकार आहेत 

1 टिप्पणी:

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad