Breaking

Post Top Ad

मंगळवार, १५ डिसेंबर, २०२०

कंत्राटी तत्वावर काम वाटपाबाबत अर्ज आमंत्रित

कंत्राटी तत्वावर काम वाटपाबाबत अर्ज आमंत्रित
यवतमाळ : बेरोजगारांच्या सेवा सहकारी सोसायट्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने 3 लक्ष रुपये इतक्या रकमेची कामे विना निविदा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हास्तरावर काम वाटप समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने काम वाटप समितीकडे जिल्ह्यातील उमरखेड, पुसद, राळेगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि महागाव येथील शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र येथे सफाईगार कामाकरीता बेरोजगार सेवा सोसायट्यांना कामवाटप करण्यासंदर्भात प्रस्ताव प्राप्त झाला आहे.

शासन निर्णयाप्रमाणे सदर कामाकरीता प्रती तास 72.50 रुपये असे एकूण दररोज 4 तास याप्रमाणे प्रती दिवस 290 रुपये प्रमाणे संस्थेने ठरवून दिलेल्या वेळेत कामाचे तास गणण्यात येईल. (सुटीचे दिवस वगळून) याप्रमाणे कंत्राटी तत्वावर काम वाटप करावयाचे आहे. ज्या नोंदणीकृत सेवा सोसायटींनी या कार्यालयाकडून नोंदणी प्रमाणपत्र अद्यावत केले आहे आणि ज्या संस्थेचे ऑडीट रिपोर्ट अद्ययावत आहे, अशा संस्थांनी वरील कामाबाबत आपले प्रस्ताव दिनांक 29 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कार्यालयास सादर करावी.


आवश्यक अटी व शर्तीची पुर्तता करणे अनिवार्य आहे. उशिरा प्राप्त झालेली तसेच अपूर्ण स्वरुपातील प्रस्ताव अपात्र ठरवून स्विकारण्यात येणार नाहीत. याची कृपया नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त वैशाली पवार यांनी केले आहे. यासाठी संस्थेचे अद्ययावत नोंदणी प्रमाणपत्र, संस्थेचे ऑडिट रिपोर्ट (सन 2018 - 19), बँकेचे स्टेटमेंट, संस्थेतील सर्व सदस्यांची अद्यावत यादी व सेवायोजन नोंदणी प्रमाणपत्र यांची आवश्यकता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad