Breaking

Post Top Ad

शनिवार, ५ डिसेंबर, २०२०

बालसुधारगृहात दोन मुलांची आत्महत्या

बालसुधारगृहात दोन मुलांची आत्महत्या
बुलढाणा येथील बालसुधार गृहात रात्रीच्या सुमारास दोन मुलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा गंभीर प्रकार सकाळी दरम्यान उघडकिस आल्याने एकच खळबळ उडाली. नेमकं आत्महत्या करण्यामागचे कारण लवकरच पोलीस तपासातून पुढे येईल.

मंगेश डाबेराव वय वर्ष १५ आणि गजानन पांगरे वय वर्ष १७ अशी आत्महत्या केलेल्याची नावे आहेत. बुलढाणा शहरात हाजीमलंग दर्ग्याच्या बाजूला असलेल्या या बालसुधार गृहात इतरही मुले राहतात.सकाळी ही बाब त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी आरडाओरड केली.तात्काळ पोलिसांना खबर देऊन पोलीस घटनास्थळी दाखल झाले.या प्रकरणी पुढील तपास पोवीस करित आहे.

1 टिप्पणी:

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad