यवतमाळ : प्रेम हे अंधळ असते.प्रेमाला आजकाल काही मर्यादा राहिलेली नाही,त्यामुळे कोणीही एकतर्फी प्रेम करू शकतो अशीच काही घटना यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या मारेगांव येथे घडल्याची घटना घडली.
शेतात काम करीत असलेल्या तरुणीवर एकतर्फी प्रेमातून प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली। असून तिच्यावर यवतमाळ च्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथे घडली. संशयित आरोपी चिंतामण पुसनाके याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
२२ वर्षीय तरुणी आपल्या बहिणी सोबत शेतात काम करत होती. त्याच दरम्यान आरोपी चिंतामण हा तिथे आला त्याने तरुणीशी वाद घातला आणि काही वेळातच तरुणीवर धारधार शास्त्राने हल्ला केला. तरुणी रक्त बंबाळ अवस्थेत खाली कोसळली तेव्हा आरोपी घटना स्थळावरवून फरार झाला. त्या नंतर तरुणीचे काका त्या ठिकाणी पोहचले त्यांनी मुलीला खांद्यावर घेऊन अर्ध्या किलो मीटर अंतरावर असलेलं गाव गाठलं आणि जखमी तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केला. मुलगी गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे दाखल करण्यात आले या प्रकरणी आरोपी चिंतामण पुसनाके याला पोलिसांनि ताब्यात घेतले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response