Breaking

Post Top Ad

बुधवार, ६ जानेवारी, २०२१

यवतमाळमध्ये 'राडा'

यवतमाळमध्ये 'राडा'
यवतमाळ शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आयडियल कोचिंग क्लासेस मध्ये दोन विद्यार्थ्यांमध्ये जबरदस्त 'राडा' झाल्याची घटना घडली.या राडा मुळे उपस्थितीत विद्यार्थामध्ये काही वेळेसाठी भितीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.


तुफान राडा'बाजी' झाल्या नंतर दोन्ही विद्यार्थ्यां गंभीर जखमी झाले.तद्नंतर शहर पोलीस स्टेशन मध्ये घटनेची फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेण्यात आली.घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव रोहित आणि तेजस अशी आहेत.


आयडियल कोचिंग क्लासेस मध्ये शिकवणी करिता गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये शुल्लक कारणावरून वाद झाला.वादाचे रूपांतर 'राडा' मध्ये झाला.मात्र कोचिंग क्लासेस संचालक यांनी अशी कोणतीही घटना आमच्या क्लासेस मध्ये घडली नसल्याची माहिती माध्यम प्रतिनिधींना दिली आहे.तर दुसरी कडे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad