प्रजासत्ताक दिनी वाशिम येथे जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक नागरीक त्यांच्या समस्या घेऊन खासदार भावना गवळी यांना भेटायला आले होते. या दरम्यान अनेक विकास कामात भाजपाचे आमदार राजेंद्र पाटणी पाटणी हे अडथळा निर्माण करीत असल्याचे समोर आले. त्यामुळे जनतेच्या वतीने खासदार भावना गवळी यांनी आमदार पाटणी यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान पाटणी यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत भावना गवळी यांचा अपमान केला. एवढेच नव्हे तर अनेक ठिकाणी बंद पाळून नागरीकांना सुध्दा वेठीस धरण्याचा प्रयत्न केला.
या अपमानाचे पडसाद आज यवतमाळात सुध्दा उमटले. स्थानिक दत्त चौकात शिवसैनिकांनी आमदार पाटणी यांच्या पोस्टर्सला चपलीने बदडले. त्यानंतर हे पोस्टर्स जाळण्यात आले. याप्रसंगी संतोष ढवळे यांनी पाटणी यांना यवतमाळात आल्यास बदडण्याचा इशारा दिला आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख पिंटु बांगर यांनी सुध्दा महिला खासदाराचा अपमान सहन करणार नसल्याचे सांगत या घटनेचा निषेध केला आहे. याप्रसंगी शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटक मंदाताई गाडेकर यांनी सुध्दा आमदार पाटणी यांनी महिलेचा अपमान केल्यामुळे ते राक्षसी प्रवृत्तीचे असल्याची टिका केली. गुणवंत ठोकळ, अतुल गुल्हाणे यांनी सुध्दा सदर घटनेचा निषेध केला. मराठा समाजाच्या वतीने लक्ष्मण गवळी यांनी निषेध केला. याप्रसंगी संतोष ढवळे, पिंटू बांगर, सुरेश ढेकळे, गुणवंत ठोकळ, वसंत जाधव, ठाकरे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response