Breaking

Post Top Ad

बुधवार, १३ जानेवारी, २०२१

मतदान बूथ परिसरात ह्या दहा विषया पासून रहा दूर

मतदान बूथ परिसरात ह्या दहा विषया पासून रहा दूर
यवतमाळ : जिल्ह्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचार संहिता लागू केलेली आहे. फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) अन्वये जिल्ह्यातील ज्या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणूक होत आहे, अशा भागात मतदानाच्या दिवशी  (दि. १५ जानेवारी २०२१) मतदान केंद्र परिसरात जमाव करण्यास मतदारांना बळजबरीने मतदान करण्यास किंवा मतदान न करण्यास प्रवृत्त करणे, उमेदवाराच्या निवडणूक चिन्हाचे प्रदर्शन करणे मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट व ईतर ईलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करून वाहनाचा मतदान केंद्रामध्ये अनाधिकृत प्रवेश यावर बंदी घालणे आवश्यक असल्याचे तसेच १०० मीटर परिघाच्या आत मतदान केंद्र परिसर म्हणून वर्णन केलेल्या मतदान केंद्राच्या परिसरात आणि मतदान मंडपामध्ये भ्रमणध्वनी, तारविरहीत दुरध्वनी आणि बिनतारी संदेश संच इ. बाळगण्यास किंवा वापरण्यास कोणत्याही व्यक्तींना मुभा नाही.


केवळ ग्रा. पं. निवडणू निरिक्षक, मतदान केंद्राध्यक्ष व सुरक्षा कर्मचारी वर्ग यांनाच भ्रमणध्वनी बाळगण्यास मुभा आहे. परंतु त्यांचे भ्रमणध्वनी नि:शब्द (सायलेंट मोडवर) ठेवतील. तसेच मतदानाच्या अनुषंगाने एकावेळी पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव कुठेही करता येणार नाही, असे जिल्हाधिका-यांनी आदेशीत केले आहे.हा आदेश यवतमाळ जिल्ह्यातील नगरपरिषद / नगरपंचायत क्षेत्र व ज्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक नाही ,अशी नावे वगळता संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याकरीता दि.१४ जानेवारी २०२१ चे सकाळी ६ वाजता पासून ते दि. १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान प्रक्रीया संपेपर्यंत लागू राहील.तथापी हा आदेश सर्व मतदानांशी संबंधीत अधिकारी, पोलीस अधिकारी, सुरक्षा पथकातील कर्मचारी, निवडणूक निरिक्षक यांना लागू राहणार नाही. या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ नुसार कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमुद आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad