घाटंजी पालिकेच्या महत्वाच्या पदावर नगराध्यक्ष म्हणुन नयना ठाकूर तर उपाध्यक्ष शैलेश ठाकूर हे या पदावर कार्यरत आहे.लोकसेवक म्हणुन कार्य करित असताना,दोघा कडून कामात अनियमिता केल्याचा ठपका त्यांच्या वर ठेवण्यात आला आहे.विशेष म्हणजे नगर विकास खात्याने या बाबत नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली असून १५ दिवसाच्या आत स्पष्टीकरण न दिल्यास कडक कारवाई करण्याचे त्यात नमुनद केले आहे.
नगराध्यक्ष-उपाध्यक्ष यांच्या वरील आरोप
महाबलाय व्यायम शाळेच्या अटीचा भंग करणे,त्यांना वाढीव बांधकाम करण्यास परवानगी देणे.सदरच्या राखीव जागेवर १० वर्षाचा कालावधी होवूनही बगीचा विकसित केलेला नाही.सदरच्या इमारती मध्ये लोकसेवक हे वास्तव करत असून त्यामध्ये केबल नेटवर्कचा व्यवसाय करित आहे. नगर परिषदेच्या गाळ्यामध्ये विना परवानगी बांधकाम करून,सदरच्या गाळ्यात भागीदारीत प्रतिबंधीत असलेल्या विहिरीच्या बाजूने भिंत फोडून विना परवानगी दरवाजा केलेला आहे. बांधकाम विभागातील अभियंता व आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षक या रिक्त पदावर यापूर्वी घेण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मुदतवाढ विषयी क्रमाने न घेणे,ठरावा मंजूर झाल्यानंतर त्यात जादा मजकूर समाविष्ट करणे,ठरावा नोंदवही मध्ये खाडाखोड करून नवीन मजकूर समाविष्ट करण्यासाखी गैरवर्तणूक केल्याचा ठपका नगराध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या वर ठेवण्यात आला आहे.
पदावरुन दुर का करण्यात येऊ नये
गंभीर स्वरूपाच्या अनिमिततेबाबत महाराष्ट्र नगरपरिषदा,नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ५५ अ.व.ब.नुसार घाटंजी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा व उपाध्यक्ष यांना पदावरून दूर करून पुढील सहा वर्षाच्या कालावधीसाठी पालिका सदस्य होण्यास अथवा कोणत्याही इतर स्थानिक प्राधिकरणाचा सदस्य होण्यास अनर्ह का करण्यात येऊ नये असे खडे बोल पत्रात सुनावले आहे.
विशेष म्हणजे घनकचरा व्यवस्थापन ठेका ठेकेदारास देवूनही सफाई कामगारांकडून दिवसा व रात्री सुध्दा साफ-सफाई कामे करून घेणे, 'हम करे सो कायदा' या मनासारखे ते न वागल्यास त्या कर्मचाऱ्यांना निलंबित व कामावरून कमी करण्याची धमकी देणे,विशेष सभा अधिक्षक यांना मानसिक त्रास देऊन इतर सदस्यांना सह कर्मचाऱ्यांकडून पैशाची मागणी करून दडशाही करणे असे नगर विकास विभागाच्या पत्रात म्हटले आहे. उपाध्यक्षांना कोणतेही अधिकार नसताना शाळा बंद ठेवण्यासाठी मुख्याध्यापकांना पत्र पाठवून आदेश देण्याचे गैरवर्तन केले आहे.त्यामुळे नगराध्यक्ष सह उपाध्यक्ष दोघेही अडचणीत येणार असल्याची माहिती आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response