यवतमाळ:शनिवारी मध्ये रात्री दरम्यान भंडारा येथील जिल्हा सामान्य रूग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशू केअर युनिटमध्ये आग लागल्याने १० बालकांचा होरपळून मृत्यू झाला.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असताना यवतमाळचे जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी सर्व यंत्रणेची झाडाझडती घेतल्याचे समोर आले आहे.
जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह
जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी दि.१० जानेवारी रोज रविवारला सार्वजनिक बांधकाम विभाग,श्री.वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय व रूग्णालय, जिल्हा शल्य चिकित्सक,जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा प्रशासन अधिकारी,जिल्हा अग्निशमन अधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना शासकीय,निमशासकीय,सार्वजनिक उपक्रमांच्या तथा अन्य सर्व इमारतींमध्ये अग्निशमन सुरक्षा यंत्रणा बसविण्या बाबत आदेश दिले आहे.
दोन महिन्यांनी होते तपासणी
श्री.वसंतराव नाईक जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाची फायर ऑडिट २०१९ मध्ये करण्यात आली असून सर्व वायरिंगची तपासणी दर दोन महिन्यांनी विघुत विभागाच्या माध्यमातून करण्यात येते.
दोन दिवसा पुर्वी भंडारा येथील जिल्हा सामान्य रूग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागल्याने त्यात १० नवजात शिशूंचा होरपळून मृत्यू झाला होता.त्या अनुषंगाने भंडाऱ्यां सारखी घटना यवतमाळ जिल्ह्यात घडू नये यासाठी जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी शासकीय आणि निमशासकीय यंत्रणेला जागृत राहण्या संदर्भात आदेश दिले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response