Breaking

Post Top Ad

गुरुवार, ७ जानेवारी, २०२१

'या सनदी अधिकाऱ्यांने अपत्य होऊ न देण्याचा घेतला निर्णय'

'या सनदी अधिकाऱ्यांने अपत्य होऊ न देण्याचा घेतला निर्णय'
यवतमाळ: आयएसआय अधिकारी म्हटल्यावर त्याला कोणत्याचं गोष्टीची कमतरता नसते.एकाद्याला बस म्हटल तर पुढचा व्यक्ती लोटागंण घालण्याची तयारी ठेवते. असे असताना देशातील एका सनदी अधिकाऱ्यांनी अपत्य होऊ न देण्याचा निर्णय घेतलं असेल तर बहुतेक कोणालाच खर अथवा त्या गोष्टीवर विश्वास बसणार नाही.मात्र होय हे खर आहे. 

'या सनदी अधिकाऱ्यांने अपत्य होऊ न देण्याचा घेतला निर्णय'
कधी काळी यवतमाळ च्या पंचक्रोषीत जिल्हाधिकारी म्हणुन कार्यरत असताना त्यांनी केलेले सामाजिक कार्य डोळे भरणारे आहे.प्रशासकीय सेवेत आभाळाची उंची गाठणारे अधिकारी म्हणुन त्यांच्या कडे आजही आपुलकीने पाहीले जाते.पद,पदवी,पैसा,पुरस्कार आदी बाबी वाऱ्यावर सोडून वाऱ्यावर सोडलेल्या समाजातील अंतिम टोकाच्या कार्य कतुर्त्व आणि कर्तबगार होतकरू माय-बापांच्या लेकरांना अगदी माझ्या सारख्यांना 'अंबर दिव्या'च्या गाडीत फिरता यावं आणि शोषित पिडीत,वंचित घटकांची आजीवन सेवा करता यावी यासाठी खाजगी जिवन बासनात गुंडाळून ठेवण्याचा निर्णय आयुक्त डाॅ.हर्षदीप कांबळे यांनी घेतला. 

साडी,माडी,गाडी या परिघा बाहेर न पडणाऱ्या प्रशासनातील तमाम सनदी प्रशासकीय अधिकाऱ्यांना हा एक संदेश आहे.आयुष्यभर अंबर दिव्याच्या झगमगाटात आयुष्य उजळून जाईल किंबहुना येणाऱ्या तीन पिढ्यांचं भलं होईल अशा सर्व सुख सोईसुविधा वाऱ्यावर सोडून समाजा साठी सर्वत्र अपर्ण करणारे यवतमाळचे तात्कालीन जिल्हाधिकारी तथा राज्याचे विद्यमान आयुक्त डाॅ हर्षदीप कांबळे यांनी घेतलेल्या निर्णयाचे सगळीकडे कौतुकाचा विषय ठरला आहे. डाॅ.हर्षदीप कांबळे यांच्या अर्धांगीनेने आपल्या यजमानाच्या निर्णयाला आभाळा एवढी साथ दिल्याने त्या माऊलीचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.

२८३ कुमारी मातेला दिला दिलासा

यवतमाळ जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण विदर्भामध्ये कुमारी मातेची समस्या भयावह आहे. प्रशासकीय स्तरावर याची नोंद काही प्रमाणात केली गेली असली तरी यवतमाळ जिल्ह्यामध्ये २८३ कुमारीमाता अस्तित्वात असून मल्टीपर्पज फाउंडेशनी २०१० मध्ये सर्वेक्षण करून या माता शोधल्या होत्या त्यांच्या मुलांना दत्तक घेऊन शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी डॉ.हर्षदीप कांबळे यांनी कमालीची मदत केली आहे या प्रक्रियेमध्ये अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य माजी न्यायाधीश चंद्रभान स्थूल यांना या परिसराचा दौरा करून संपूर्ण जगासमोर कुमारी माता ची समस्या उजागर करण्यात फाऊंडेशनला यश आले असले तरी या कार्यामध्ये डॉ.हर्षदीप कांबळे यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.

सर्वसामान्य कुटुंबातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली पाहिजे आणि ती प्रशासकीय पदावर गेली पाहिजे आशा आणि अपेक्षा मनामध्ये ठेवून महाराष्ट्र राज्याचे उद्योग सचिव तथा विकास आयुक्त डॉक्टर हर्षदीप कांबळे यांनी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी पारधी कोलाम तसेच अनुसूचित जाती जमाती ओबीसी समुदायातील तब्बल ३३ मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेऊन त्यांना थेट अमेरिकेपर्यंत पाठविले आहे.यवतमाळ जिल्ह्यातील बोरगाव येथील सुरज डांगे नावाच्या विद्यार्थ्याला थेट अमेरिकेतील विद्यापीठात शिक्षणासाठी पाठविले विशेष मध्ये यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना डॉ.हर्षदीप कांबळे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व स्तरांमध्ये असणाऱ्या प्रत्येक समाज घटकातील दुर्लक्षित विद्यार्थ्यांकडे आपले लक्ष केंद्रित केले आणि थेट अकोला मुकिंदपुर पारधी पाड्यावर जाऊन त्या ठिकाणी त्यांनी जवळपास तीन तास पारधी समाजातील मुलांची हेतू साध्य होतात आणि त्यानंतर या धड्यावरील १८ मुले दत्तक घेतले.त्यातून आज ११ मुले नोकरीवर लागले आहेत. या मुलांचा शिक्षणाचा खर्च डॉक्टर कांबळे यांनीच केला असून जरी महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात नोकरीसाठी गेलो असलो तरी माझे सदैव तुमच्या साठी प्रेम आणि सहकार्य राहील अशा प्रकारची भावना त्यांनी यवतमाळ येथे विश्राम गृहात व्यक्त केली. 

"जिल्हाधिकारी सिंह तळमळीचा माणुस"

यवतमाळ जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा करीत असताना यवतमाळचे जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांच्याशी बोलत असताना अनेक विषयांवर त्यांची चर्चा झाली विशेष म्हणजे या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या अनेक समाज घटकांसाठी बरेच काही करण्यासारखे आहे.आपणासारख्या होतकरू प्रशासकीय अधिकाऱ्याने केले तर पुनश्च ऐतिहासिक गोष्टी करू शकतात त्यामुळे सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना मदत करणे तेवढेच गरजेचे आहे. सिंह यांनी बोलताना मी सुद्धा शिक्षणासाठी यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मदत करून त्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी पाठविले आहे. दोन्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेली विद्यार्थ्यांना मदत ही सर्वात मोलाचे असून याबाबत सर्वसामान्य जनतेमध्ये समाधान व्यक्त केले जातात आहे.

बिटरगाव या ठिकाणी असणारा बुद्धभूषण इंगोले नावाचा मुलगा चंद्रमुखी मध्ये राहत होता. त्याला शिक्षणासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये याकरिता थेट मुंबईहून त्याला शिक्षणासाठी मदत पाठविली व तु सध्या नांदेड येथील अकॅडमी मध्ये नीट चा अभ्यास करत आहे, तर बाभूळगाव तालुक्यांमध्ये असणाऱ्या दोन बहिणी झोपडपट्टी मध्ये वास्तव्य करत होत्या त्यांना दत्तक घेऊन अमरावती येथे वैद्यकीय शिक्षणासाठी पाठवून त्यांचा शिक्षणाचा खर्च उचलला आहे. एवढेच नाही तर राज्यातील कित्येक जिल्ह्यांमध्ये असणाऱ्या दुर्लक्षित मुलांना दत्तक घेऊन त्यांनी शिक्षणाचा खर्च उचलल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या अंधकारमय आयुष्यामध्ये प्रकाशाचे दीप तेवत ठेवण्याचे महान कार्य सनदी अधिकारी डाॅ.हर्षदीप कांबळे यांच्या कडून होत आहे.

अमरावतीच्या इंगळे ला पंधरा वर्ष मदत

यवतमाळचे जिल्हाधिकारी असताना मदतीच्या एका कार्यक्रमामध्ये एक विद्यार्थी संचालन करीत होता परिस्थितीने अत्यंत गरीब होता परंतु शिक्षणाची ओढ मात्र त्याला सातत्याने होती त्यावेळी त्याने डॉ. हर्षफिप कांबळे यांची भेट घेतली त्यानंतर त्याला त्याच ठिकाणी डॉक्टर कांबळे यांनी शिक्षण सिक मी तुला मदत करेल अशा प्रकारची अभिवचन दिले होते त्यानंतर त्यांची पंधरा वर्ष भेट झाली नाही परंतु त्या विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये दर महिन्याला आपल्या पगारातून शिक्षणासाठी मदत पाठवली जायची जेव्हा तो बुलढाणा येथील तंत्रनिकेतन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले त्यानंतर त्यांनी यांची भेट घेतली एका गुरु-शिष्याची पंधरा वर्षे भेट झाल्यानंतर अभिवचन दिलेल्या आयुक्तांनी शेवटी इंगळे नामक विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये प्रकार सातत्याने तेवत ठेवला.
'या सनदी अधिकाऱ्यांने अपत्य होऊ न देण्याचा घेतला निर्णय'

महाराष्ट्र राज्याचे विकास आयुक्त तथा उद्योग सचिव व यवतमाळ जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी डॉ.हर्षदीप कांबळे यांनी थायलंड येथील रोजाना यांच्याशी विवाह केला धम्मचक्र होणे मध्ये सक्रिय असणाऱ्या व धम्मदान यामध्ये जगामध्ये अग्रेसर असणाऱ्या या दोन्ही दाम्पत्यांनी आपल्या आयुष्याचा मोठा धक्कादायक निर्णय घेतला यानंतर कुठलेही अपत्य होऊ न देता समाजातील दुर्लक्षित असणारे मुले यांचे अपत्य आहेत आता यानंतर कुठल्याही प्रकारचे अपत्य होऊ द्यायचे नाही असा धक्कादायक निर्णय घेऊन संपूर्ण जगासमोर एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे जगातील जवळपास दहा देशांमधून सामाजिक कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात आले असून महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील आदर्श असणाऱ्या या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कौतुक सर्वत्र स्तरांमधून केले जात आहे या निर्णयाला त्यांच्या पत्नी यांची सावलीसारखी साथ असून धम्मचक्र विला संपूर्ण आयुष्य खर्ची घालायचा निर्णय घेतल्याने भारताच्या इतिहासामध्ये ही ऐतिहासिक नोंद केली जाईल की अनाथ गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad