वाशीम येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक दि.२६ जानेवारी जिल्हा नियोजन भवनामध्ये आयोजित करण्यात आली होती.सदर सभा सुरू होण्यापूर्वीच खासदार भावना गवळी आणि आमदार राजेंद्र पाटणी या दोन्ही लोकप्रतिनिधी मध्ये विकास कामांच्या कारणावरून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बाचाबाची झाल्याची घटना घडली.तद्नंतर त्यांचे पडसाद वाशीम शसरासह जिल्हात काही वेळातच उमटले.
खासदार गवळीच्या मदतीला भाऊ येईल का?
खासदार भावना गवळी आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यातील गटबाजी उघड आहे.दोघांमधील गटबाजी थेट मातोश्री पर्यंत गेली आहे.असे असतांना आमदार राजेंद्र पाटणी यांच्या बाजूने ताकत भक्कम असल्याचे दिसून येत असताना भावनाताईंच्या मदतीला राज्याचे वनमंत्री संजय'भाऊ' राठोड येईल का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
खासदार भावना गवळी आणि भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात विकास कामा वरून जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली.या घटनेची लोन संपूर्ण जिल्हात पोहचल्याने अनेक ठिकाणी बंद पाळण्यात आला.शिवसेनेच्या खासदार भावना गवळी आणि भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात गेल्या काही महिन्या पासून वाद सुरू आहे. प्रजासत्ताक दिनी हा वाद उफाळून आल्याने भाजप कार्यकर्त्यांनी वाशीम आणि कारंजा बंदची हाक दिली होती. खासदार आणि आमदार वादामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहे. वाशीम येथील घटनेची लोन थेट यवतमाळ मध्ये पोहचल्याने खासदार भावना गवळी समर्थकांनी गुरूवारी दत्त चौकात भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचा पुतळा जाळला. यवतमाळ मध्ये आमदार पाटणी आल्यास त्याला धडा शिकवणार असल्याचा इशारा संतोष ढवळेंनी दिला.त्यामुळे हा प्रकरण भडकणार असल्याचे दिसते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response