Breaking

Post Top Ad

मंगळवार, २६ जानेवारी, २०२१

डाॅ.सुनिल भवरेंच्या नावावरून युवकाची फसवणूक

डाॅ.सुनिल भवरेंच्या नावावरून युवकाची फसवणूक
आर्णी(यवतमाळ) मोठ्या व्यक्तीचे फेसबूक हॅक करून संबधित व्यक्तीच्या नावावरून आणि मेसेंजर च्या माध्यमातून हिंदीत चाॅट करून फसवणूक करण्याचा विषय हा जुनाच जरी असला तरी देखील आजही फसवणूक करणचे सुरूच असल्याचा प्रकार आज दि.२६ जानेवारी दरम्यान उघडकीस आला.

डाॅ.सुनिल भवरेंच्या नावावरून युवकाची फसवणूक
आर्णी ग्रामीण रूग्णालयाचे वैधकिय अधिक्षक डाॅ.सुनिल भवरे यांचा स्वतःचा फेसबूक ऑकांऊट आहे.सकाळी कोणी तरी डाॅ.भवरे यांचा फेसबूक ऑकांऊट हॅक करून तालुक्यातील बोरगांव येथील मेडिकल मालक लियाकत शेख यांना मेसेंजर च्या माध्यमातून डाॅ.भवरेंनी पैशाची मागणी केली.एवढा मोठा डाॅक्टर पैशाची मागणी करित असल्याने 'लियाकत'ने सर 'मी लगेच पैसे गुगल पे वरून पाठवतो' असे म्हणत आठ हजार नऊशे रूपये पुनीत शर्मा नावाच्या व्यक्तीच्या खात्यात टाकले.

डाॅ.सुनिल भवरेंच्या नावावरून युवकाची फसवणूक
फेसबूक वरून पैशांची घेवन देवन करू नका

सध्या फेसबूक हॅक मोठ्या प्रमाणात केल्या जात आहे.अशा वेळे हॅकर दुसऱ्या च्या नावाचा वापर करून तुमची फसवणूक करतो.त्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी फेसबूक वरून पैशाचा व्यवहार करू नका

डाॅ.सुनिल भवरेंच्या नावावरून युवकाची फसवणूक
तद्नंतर लिखाकत ने डाॅ.भवरे यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क करित सर पैसे आले का असे विचारले असता डाॅक्टर "भवरेंनी मी कधी पैसे मागीतले" अशा सवाल केल्या नंतर लिखाकत ला डाॅ.भवरेंनी माझा फेसबूक ऑकांऊट सकाळीच हॅक झाला आहे,अशी माहिती दिल्याने बोरगांव येथील लिखाकत ची फसवणूक झाल्याचे समोर आले. ग्रामीण रूग्णालयाचे वैधकिय अधिक्षक डाॅ.सुनिल भवरे यांनी सोशल मिडीया वर माझा फेसबूक ऑकांऊट सकाळीच हॅक केल्याची माहिती दिली.त्यामुळे कोणीही माझ्या नावावर पैशाची मागणी करित असेल तर करू नका असे आवाहन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad