Breaking

Post Top Ad

शनिवार, २० फेब्रुवारी, २०२१

जिल्ह्यात १४५ जण नव्याने पॉझिटीव्ह


जिल्ह्यात १४५ जण नव्याने पॉझिटीव्ह
यवतमाळ,  गत 24 तासात जिल्ह्यात दोन मृत्युसह 145 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 81 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

सुरवातीपासून आतापर्यंत 151742 नमुने पाठविले असून यापैकी 151302 प्राप्त तर 440 अप्राप्त आहेत. तसेच 135332 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

शनिवारी एकूण 1380 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 145 जण नव्याने पॉझिटीव्ह आले तर 1235 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 929 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 15970 झाली आहे. 24 तासात 81 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 14595 आहे. तर जिल्ह्यात एकूण 446 मृत्युची नोंद आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिमध्ये यवतमाळ तालुक्यातील 50 वर्षीय आणि नेर तालुक्यातील 41 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच पॉझिटीव्ह आलेल्या 145 जणांमध्ये 84 पुरुष आणि 61 महिला आहेत. यात यवतमाळातील 63 रुग्ण, पुसद येथील 25, दिग्रस 17, कळंब 16, दारव्हा 15, महागाव 4, घाटंजी 2, झरीजामणी 2 आणि नेर येथील 1 रुग्ण आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad