Breaking

Post Top Ad

बुधवार, २४ फेब्रुवारी, २०२१

जवळा हे गांव प्रतिबांधित क्षेत्र म्हणुन घोषित

जवळा हे गांव प्रतिबांधित क्षेत्र म्हणुन घोषित
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे रुग्ण आढळून येणारा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत निर्देशित केले आहे. उपविभागीय अधिकारी, यवतमाळ यांनी आर्णी तालुक्यातील जवळा या गावात कोविड पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने सदर गावास प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत प्रस्तावित केले आहे. त्यानुसार आर्णी तालुक्यातील जवळा या गावास प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत असून सदर भागाच्या सिमा पुढील आदेशापावेतो बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिला आहे.


प्रतिबंधित क्षेत्रासाठी लागू करण्यात आलेले नियम वरील नमूद प्रतिबंधित क्षेत्रासाठी लागू राहतील. जे वरील आदेशांचे उल्लंघन करतील त्यांचेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधीत कायदे व नियम अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.


या आदेशाच्या कालावधीत शासकीय कर्तव्यावर असलेले अधिकारी- कर्मचारी यांना अत्यावश्यक सेवेकरीता कर्तव्य करण्याची मुभा राहील. तसेच जवळा ग्रामपंचायतीच्या सचिवांनी अत्यावश्यक सेवा पुरवठाधारकांना परवाना/ पासेस निर्गमित कराव्यात आणि सदर्हु परवाना/ पासेस धारकांची यादी संबंधित पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांना तात्काळ द्यावी. सदर्हु परवाना / पासेस धारकांना अत्यावश्यक सेवा, पोलीस स्टेशन अधिकारी यांनी नेमून दिलेल्या ठराविक वेळेत पुरविण्याची मुभा राहील. तसेच सदर्हु अत्यावश्यक सेवा पुरवठा करतांना सामाजिक अंतरचे व इतर आरोग्य विषयक नियमांचे पालन करण्याची जबाबदारी सचिव यांनी त्यांच्या अधिनस्त कर्मचारी यांचे मार्फत करावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad