मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जगप्रसिद्ध असलेल्या लोणार सरोवराचा आढावा घेण्यासाठी बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते, आणि यावेळी लोणार सर्व सरोवराला भेट देऊन आढावा घेत असताना सरोवराचे नैसर्गिक सौंदर्य पाहून स्वतःच्या मोबाईल मध्ये फोटो काढण्याचा मोह खुद मुख्यमंत्र्यांना आवरता आला नाही. त्यांनी स्वतःचा मोबाईल काढून आपल्या मोबाईल मध्ये लोणार सरोवराचे सौंदर्य कैद केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटोग्राफीचा छंद सर्वश्रुत आहे. २००४ साली उद्धव ठाकरे हे लोणार येथे आले असताना त्यांनी हेलिकॉप्टर मधून या जगप्रसिद्ध सरोवराचे फोटो आपल्या कॅमेऱ्यात टिपले होते. आणि त्यातीलच एक स्वतः काढलेला फोटो त्यांनी आपल्या महाराष्ट्र देशा या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर देखील छापला आहे. याचा उल्लेख त्यांनी पुस्तकात देखील केला आहे.त्यामुळे नुकताच बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्या मुख्यमंत्री असताना त्यांनी लोणार सरोवराचे फोटो काढण्याचा मोह उद्धव ठाकरेंना आवरता आला नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response