राज्याच्या राजकारणात अनेक नेते मंडळी घडली.मोठी झाली मात्र काळ आणि वेळ जसे जसे बदलत गेली तसे तसे नेत्यांचे नावं मागे पडली.नेत्यांचा राज्यासाठी दिलेलं योगदानाचा विसर पडत गेला.परंतू याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अपवाद ठरले.राज्याने अनेक नेते पाहिले मात्र बाळासाहेब ठाकरे सारखा नेता ना घडला,ना घडणार.कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या ओठात आणि पोटात वेगळं नसायचं त्यामुळे बाळासाहेबांनी राजकारणात बदल काय केलं यांची अनेकांना माहिती नाही.आज बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणातून कोणता शब्द हदपार केला.आधी त्या शब्दाला कोणत्या नावाने ओळखले जायाचं.आता त्यात काय बदल झालंय हे सविस्तर आज आपण वाचणार आहोत.
मराठी अस्मितेच्या मुद्यांवरून वाघाची डरकाळी फोडणारी संघटना म्हणुन शिवसेनेची स्थापना सन १९६६ ला बाळासाहेबांनी केली.आक्रमक वक्ता,आक्रमक संघटना,संघटनेतील पहिल्या फळीचे आक्रमक नेते अशी ओळख शिवसेनाप्रमुख सह शिवसेनेची राज्यासह देशात निर्माण झाली.सुरूवातीला शिवसेनेला 'वसंतसेना' देखील म्हणतं होते.त्यामागचे कारण असे की,राज्यात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणुन राहिलेले वसंतराव नाईक यांनी बाळासाहेब ठाकरेंना मदत केली.त्यामुळे शिवसेनेला 'वसंतसेना' या नावाने ओळखले जात होते.बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक वेळा त्यांच्या ठाकरे शैलीत वसंतराव नाईक यांनी केलेली मदत आणि त्यांची असलेली मैत्री या संदर्भात भाषणात उल्लेख करित बोलून सुद्धा दाखवले आहे.
राज्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा योगदान काय अशा प्रश्न अनेकांना पडत असेल तर ते साहजिकच आहे.मात्र ठाकरेंनी राज्यासाठी दिलेले योगदान विसरता देखील येणार नाही. सुरूवातीच्या काळात शिवसेना ठाणे पालिकेच्या निवडणुकीत उतरली तेव्हा बाळासाहेबांनी जी भूमिका मांडली ती निवडणुकांचा इतिहास बदलणारी ठरली. "निवडून येणारा पालिकेचा सदस्य हा तुमचा बाप नाही, तुम्ही मतदार आणि नागरिक हेच त्यांचे बाप आहात. म्हणून बाप निवडू नका;तुमचे सेवक निवडा. शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील ते तुमचे बाप नसतील, या ठाणे शहराचे पिते नसतील तर ते तुमचे सेवक असतील." यामुळेच राजकारणात नगरपित्यांना बाळासाहेबांनी नगरसेवक केले आणि आजही तोच शब्द वापरला जात आहे.
अगदी १९६७ पुर्वीच्या वृत्तपत्रातल्या बातम्या काढून बघा. तोपर्यंत त्या सदस्यांना "सिटीफादर्स" म्हणजे "नगरपिता" म्हटले जात होते.तुम्हाला नगरपिता असाच उल्लेख सापडेल.बाळासाहेब याबद्दल प्रचारावेळी हे सांगायचे तेव्हा त्यांची टिंगल टवाळी चालायची; पण आज कुणाला तो जुना शब्द नगरपिता आठवतो का तरी? महाराष्ट्राच्या आणि सरसकट वापरातून नगरपिता हा शब्द पूर्णपणे हद्दपार झाला आहे.शिवसेनेला शिव्या घालणाऱ्या लोकांपैकी शिवसेना आणि बाळासाहेबांनी राजकारणात केलेले हे अमुलाग्र परिवर्तन आज किती लोकांना माहीत आहे? शिवसेना आणि बाळासाहेबांनी राजकीय भाषेला दिलेली ही अमूल्य अशी देणगी नव्हे काय? नगरपित्याला त्यांनी 'नगरसेवक' बनवला.हे आजच्या तरूणाईने बहुतेक माहित नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response