Breaking

Post Top Ad

शनिवार, २७ मार्च, २०२१

जिल्हाधिकारी अमोल येडगे रूजू

जिल्हाधिकारी अमोल येडगे रूजू
यवतमाळ : गत काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत तसेच मृत्युच्या संख्येत झालेली वाढ कमी करण्याला आपले सर्वोच्च प्राधान्य आहे, असे नुतन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. यवतमाळ जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात बोलत होते.

जिल्ह्यात कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच लसीकरण मोहीम आणखी गतिमान करण्याचे नियोजन आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनाने सांगितलेल्या त्रिसुत्रीबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे. नागरिकांनीसुध्दा नियमितपणे मास्कचा वापर करणे, गर्दी टाळणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, हात वारंवार स्वच्छ धुणे आदी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील जास्तीत जास्त नागरिकांचे ट्रेसिं आणि टेस्टिंग करून जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर तसेच मृत्युदर कमी करण्यावर भर देण्यात येईल. यासोबतच जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने सर्वच क्षेत्राचा सर्वांगिण विकास करण्याला आपले प्राधान्य आहे, असेही जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले.

नव्या जिल्हाधिकारी पुढील आवाहन

नव्यानेच रूजू झालेले जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या समोर मोठे आवाहन असून ते कशा प्रकार आवाहानांना समोर जातात हे पाहणे गरजेचे आहे.मावळते जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी गेल्या १३ महिन्यात प्रशासनातील कामचुकार अधिकाऱ्यांना त्यांची जागा वेळीच दाखवल्या मुळे सुरूवातीच्या काळात कोरोना नियंत्रणात ठेवता आला.मात्र सध्या प्रशासनात अनेक ठक महाकठ आहे.अशा प्रस्थितीत नवे जिल्हाधिकारी येडगे त्यांच्या कडून कशा प्रकारे काम करून घेतात हे लवकरच स्पष्ट होणार आहे. 

मावळते जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी कामचुकार अधिकाऱ्यांना वेळोवेळी जागा दाखवल्याने अनेक वेळ हवसे गवसे संघटीत होऊ जिल्हाधिकारी सिंह विरोधात एल्गार पुकारला होता.परंतू जिल्ह्यातील नागरिकांचा सिंह यांना मिळालेला पांठीब्यामुळे त्यांचा नाईलाज झाला.नव्या जिल्हाधिकाऱ्यांनी वाढत्या कोरोनाच्या संकटात सर्वांना सोबत घेऊन संकटाला समोर जाणे गरजेचे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad