कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्याची सध्यास्थितीच्या विषयावर माहिती देण्यासाठी आज दि.२५ मार्च रोजी दुपारी दरम्यान 'गार्डन हॉल' येथे जिल्हाधिकारी सिंह यांनी पत्रकार परिषद बोलावली होती.दरम्यान यावेळी,पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील,प्रमोदसिंह दुबे आणि डॉ.मिलिंद कांबळे,उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, तरंग तुषावारे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन कोरोनावर मात करण्याचा निर्धार व्यक्त करून दाखवला.
"प्रशासनात समन्वय": पोलीस अधिक्षक पाटील
जिल्हा प्रशासन मध्ये जिल्हाधिकारी हा कुटूंब प्रमुख च्या भूमिकेत असतांना एकादा अधिकारी कामात चुकत असेल तर जिल्हाधिकारी हे जिल्ह्यातील नागरिकांच्या हितासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी केलेली चुक त्यांच्या लक्षात आणुन देतात.त्यामागे जिल्हाधिकारी यांचा व्यतिगत कोणतेही कारण नसते.आम्ही प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांमध्ये कोरोना या संकटा सोबत लढण्यासाठी समन्वय असल्याची माहिती पोलीस अधिक्षक डाॅ.दिलीप भुजबळ पाटील यांनी दिली .
जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ.दिलीप भुजबळ पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना म्हणाले कि, जिल्हाधिकारी हे आमचे कुटूंब प्रमुख,मार्गदर्शक असल्याने त्यांनी काही दिवसाआधी जिल्ह्याच्या कामात सुधारणा व्हावी यासाठी त्यांनी आयुक्तांना मासिक आवाहल पाठविला त्यामुळे प्रशासनात समन्वय नाही का अशीं चर्चा सुरु होती.मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जिल्हाधिकारी हे आमचे कुटुंब प्रमुख असल्याचे सांगून सुरु असलेल्या चर्चेची हवाच काढून टाकल्याने सर्व अधिकारी जिल्हाधिकारी यांच्या पाठीशी खंभीरपणे उभे असल्याचे भुजबळ पाटील यांनी बोलून दाखविले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response