Breaking

Post Top Ad

मंगळवार, ९ मार्च, २०२१

'यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक'

'यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक'

यवतमाळ : गेल्या तासात जिल्ह्यात दोन मृत्युसह पुन्हा ३१८ जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच स्व.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या २५८ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.


यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दररोज झपाट्याने वाढत आहे. वाढणारी रूग्णांची संख्या लक्षात घेता नागरिक जवाबदारीने वागत नसल्याने कोरोना फैलत तर नाही ना? नागरिक नियमांची काटेकोरपणे पालन करित आहेत का? असे प्रश्न या निमित्ताने प्रशासनाला पडत असावे. परंतू नागरिकांनी या संकटा कडे दुर्लक्ष करून चालणार नाही.


जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ शहरातील एका ७५ वर्षीय महिला आणि यवतमाळ तालुक्यातील ५९ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच पॉझिटिव्ह आलेल्या ३१८ जणांमध्ये पुरुष २०८ आणि महिला ११० आहेत. यामध्ये पुसद १०३, यवतमाळातील ६३ रुग्ण, दिग्रस ५६, वणी २३, बाभुळगाव २२, आर्णी ७, दारव्हा ७, कळंब २, महागाव १०, मारेगाव १, नेर ३, पांढरकवडा ८, उमरखेड ८, राळेगाव १  आणि ४ इतर रुग्ण आहेत.


मंगळवारी दि.९ मार्च रोजी एकूण १४८२ रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी ३१८ जण नव्याने पॉझिटीव्ह आले तर ११६४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात १९३० ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १९७४३ झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad