यवतमाळ : मंगळवारी गेल्या 24 तासात जिल्ह्यात 13 मृत्युसह 247 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 312 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
सुरवातीपासून आतापर्यंत 265455 नमुने पाठविले असून यापैकी 257941 प्राप्त तर 7514 अप्राप्त आहेत. तसेच 229805 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
मंगळवारी एकूण 1972 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 247 जण नव्याने पॉझिटिव्ह आले तर 1725 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2409 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1161 तर गृह विलगीकरणात 1248 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 28136 झाली आहे. 24 तासात 312 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 25082 आहे. तर जिल्ह्यात एकूण 645 मृत्युची नोंद आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 56, 82, 68, 73, 73, 77 वर्षीय पुरुष आणि 65 वर्षीय महिला, उमरखेड तालुक्यातील 68 आणि 63 वर्षीय पुरुष, घाटंजी तालुक्यातील 32 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 85 वर्षीय पुरुष तर तालुक्यातील 45 वर्षीय पुरुष आणि पुलगाव (जि. वर्धा) येथील 72 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच आज (दि.30) पॉझेटिव्ह आलेल्या 247 जणांमध्ये 166 पुरुष आणि 81 महिला आहेत. यात यवतमाळातील 123, वणी 25, पांढरकवडा 24, बाभुळगाव 17, दारव्हा 17, पुसद 10, उमरखेड 10, महागाव 9, दिग्रस 3, कळंब 2, नेर 2, राळेगाव 2, आर्णि 1, घाटंजी 1 आणि झरीजामणी येथील 1 रुग्ण आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response