यवतमाळ: जिल्ह्यात 'कोरोना'चा वाढता प्रादुभाव लक्षात घेता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह सोबत व्हिसीद्वारे संवाद साधत एकंदरीत जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आणि वाढता प्रादुभाव या संदर्भात माहिती जाणून घेतली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व्हिसी दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी पांचाळ,जिल्हापोलीस अधिकारी डाॅ.दिलीप भुजबळ पाटील,डाॅ.मिलिंद कांबळे,डिएचओ,आरडीसी आदी जण हजर होते.यवतमाळ जिल्ह्यात मागील काही दिवसा पासून कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.त्याच अनुषंगाने दि.२६ मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यवतमाळ जिल्ह्याची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी सिंह कडून जाणून घेतली.दरम्यान यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंनी कोरोना आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना करण्याच्या संदर्भात सूचना दिल्या .
जिल्ह्यात कोविड-१९ चा वाढता प्रादुभाव लक्षात घेता जिल्ह्यामध्ये पाॅझिटिव्हीटी दर कमी करण्याच्या दृष्टिकोनातून प्रती दिवस पाच हजार टेस्ट करण्याचा उद्दिष्ट निश्चितच करण्यात आला होता.तालुका निहाय आर.टी.पी.सी.आर.अॅटीजन टेस्ट चे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले परंतू काही तालुक्यात अद्यापही पाॅझिटिव्हीटी दर कमी होतांना दिसत नाही.त्या अनुषंगाने पाॅझिटिव्हीटी दर कमी करण्यासाठी सोमवार दि.२९ मार्च पासून जिल्ह्यात दर दिवशी पाच हजार ऐवजी आता साडे आठ हजार टेस्ट करण्यात येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response