सीईओचा होतोय आरोग्य विभागाकडे दुर्लक्ष
मुख्यकार्यकारी अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक,जिल्हा आरोग्य अधिकारी हे दैनंदिन होणाऱ्या आढावा बैठकीत उपस्थतीत राहून माहिती सादर करीत नाही.विशेष म्हणजे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषेदच्या आरोग्य विभाग कडे स्पेशल दुर्लक्ष केल्याने अँटीजन किट मध्ये कोट्यवधी रुपयाची मोठी तफावत असून या बाबत संपूर्ण माहिती काही दिवसा आधी खुद्द जिल्हाधिकारी सिंह यांनी मागातीली होती.या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी मोठी तफावत असल्याचा संशय आल्याने त्यांनी आयुक्त यांच्याकडे तक्रार सुद्धा दिली आहे.
जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्या कडे सर्व विभागाच्या प्रमुखांकडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनाच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही योग्यरीत्या पार पाडण्यात येत नसल्याची तक्रार केल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.सुरुवाती पासूनच जिल्हाधिकारी सिंह हे कोरोना वर उपाय योजना करण्या संदर्भात सर्व विभाग प्रमुखांना वेळोवेळी सूचना दिल्या त्यानंतर जिल्हाधिकारी स्वतः सर्व प्रोटोकाल बाजूला ठेवून रात्री बे रात्री ते फेरफटका मारून शहराचा आढावा घेतल्याचे अनेक उदारहण जिल्ह्यातील नागरिकांनी अनुभवले आहे.
पोलीस यत्रणेवर नाही नियंत्रण
जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात संचारबंदी आदेश पारित करून सार्वजनिक ठिकाणी शारीरिक अंतर न पाळणे,मास्क न लावणे या करिता दंड निर्धारित केले असतांना पोलीस अधीक्षक यांना दंडात्मक कारवाई करणे, प्रतिबंधित क्षेत्रात पोलीस बंदोबस्त लावणे याबाबत वेळोवेळी निर्दशित केल्यानंतरही कुठेही पोलीस बंदोबस्त दिसून येत नाही किंवा त्यांच्या यत्रणेवर त्यांचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response