Breaking

Post Top Ad

गुरुवार, २५ मार्च, २०२१

यवतमाळ जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात आता पर्यंत झाले एवढे मृत्यू.

जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह : जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात

जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह


यवतमाळ: कोरोनामुळे जिल्ह्यात झालेल्या मृत्यूमध्ये शंभर पेक्षा जास्त मृत्यू खासगी रुग्णालयात झाले आहे. यांची त्रिस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात आली. त्यांचा अहवाल सादर झाला असून ज्याठिकाणी जास्त मृत्यू दर आहेत. अशांची परवानगी काढली जाणार आहे. 

 

मार्चच्या सुरुवातील जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 18 टक्यावर गेला होता. सध्या आठ टक्यावर आणण्यात प्रशासनाला यश आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी गुरुवार (ता.25) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत दिली.



यावेळी पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील, अधिष्ठाता डॉ. मिलींद कांबळे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर उपस्थित होते. पुढे बोलताना जिल्हाधिकारी सिंह म्हणाले की, जिल्ह्यात आतापर्यंत 583 मृत्यू झाले आहे. यातील शंभरपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू खासगी रुग्णालयात झाले आहे.


मुख्यमंत्र्यांचे सल्लागार दिपक म्हैसकर यांनी मृत्यू अंकेक्षण करण्याचे आदेश दिले होते. जिल्ह्यात अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकीत्सक तसेच जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांमार्फत तपासणी करण्यात आली. त्यांचा अहवाल सादर झाला आहे. त्यांच्या अहवालानुसार आता काही खासगी रुग्णालय बंद केली जाणार आहे. एक महिण्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. केंद्रशासनाचे पथक जिल्ह्यात आले होते. त्यावेळी त्यांनी तपासणी वाढविण्याची सुचना दिल्या होत्या. 



मार्च महिण्याच्या सुरुवातीला जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 18.9 टक्क्यावर गेला होता. त्यानंतर तपासण्याची संख्या वाढविण्यात आली. 15 ते 21 मार्च दरम्यान 35 हजार 62 तपासण्या करण्यात आल्या. यात 8.1 टक्के पॉझिटिव्हीटी दिसून आली. शासनाच्या सूचनेप्रमाणे टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेट यांचे अमंलबजावणी केली जात आहे. त्यामुळेच स्थिती नियंत्रणात आली आहे. मात्र, सात तालुक्यातील पॉझिटीव्ही दर जिल्ह्याच्या दरापेक्षा जास्त आहे. यात आर्णी, बाभुळगाव, दिग्रस, महागाव, पुसद, उमरखेड, यवतमाळ या तालुक्याचा समावेश आहे. 



सर्व तालुक्याचा दर दहा पेक्षा जास्त आहे. सध्यास्थितीत जिल्ह्यात दोन हजार 411 अ‍ॅक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्ण आहे. यातील एक हजार 512 रुग्ण यवतमाळ शहर तसेच ग्रामीण भागातील असल्याचेही जिल्हाधिकार्‍यांनी सांगीतले. गेल्या काही दिवसापासून मृत्यूची संख्या वाढली आहे. याचा निष्कर्ष काढला असता नागरिक उशीरा उपचारासाठी येत आहे. त्यामुळे मृत्यूसंख्या वाढत आहे. नागरिकांनी लक्षण दिसताच तत्काळ तपासणी करुन घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी सिंह यांनी केले.



होळी, धुलीवंदनासाठी कडक निर्बंध

जिल्ह्याच्या बाजूला असलेल्या अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र, जिल्ह्यातील व्यापारी तसेच नागरिकांनी सहकार्य केले. त्यामुळे तशी वेळ आली नाही. येत्या काळात अनेक सण, उत्सव, महापुरुषांची जयंती आहे. नागरिकांनी गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही घरातच होळी,धुलीवंदन साजरे करावे. सार्वजनिक ठिकाणी होळी, धुलीवंदन साजरे करण्यासाठी निर्बंध असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad