यवतमाळ : गत 24 तासात जिल्ह्यात आठ मृत्युसह 350 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 404 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
सध्या कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक होत असल्याने संपूर्ण जिल्ह्यात लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे. अशा गंभीर प्रस्तितीत लोकप्रतिनिधींनी शासन व प्रशासनाला सहकार्य जाण्याऐवजी लॉक डाऊन मागे घेण्याची मागणी केल्या जात आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 65 व 53 वर्षीय पुरुष तसेच 58 वर्षीय महिला, पांढरकवडा तालुक्यातील 36 वर्षीय पुरुष, मारेगाव तालुक्यातील 27 वर्षीय महिला, आर्णि तालुक्यातील 70 वर्षीय महिला, पुसद येथील 82 वर्षीय पुरुष आणि हदगाव (जि. नांदेड) येथील 68 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच बुधवारी पॉझिटिव्ह आलेल्या 350 जणांमध्ये 215 पुरुष आणि 135 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 165 पॉझिटिव्ह रुग्ण, वणी 37, दिग्रस 36, पांढरकवडा 27, उमरखेड 18, बाभुळगाव 16, आर्णि 12, पुसद 9, दारव्हा 6, नेर 6, कळंब 3, महागाव 3, झरी 2, मारेगाव 1, राळेगाव 1 आणि इतर शहरातील 8 रुग्ण आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 296841 नमुने पाठविले असून यापैकी 292335 प्राप्त तर 4506 अप्राप्त आहेत. तसेच 260348 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
बुधवारी एकूण 2880 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 350 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 2530 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3040 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1635 तर गृह विलगीकरणात 1405 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 31629 झाली आहे. 24 तासात 404 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 27880 आहे. तर जिल्ह्यात एकूण 709 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.67 असून मृत्युदर 2.24 आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response