जि.प. आरोग्य विभागाच्यातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरुवारी एकूण ६७३३ जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी १२२० जण नव्याने पॉझिटीव्ह आले तर ५५१३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५८२९ रुग्ण ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती ३०२७ तर गृह विलगीकरणात २८०२ रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ४४४५६ झाली आहे.
गुरुवारी दि.२२ एप्रिल रोजी पॉझिटीव्ह आलेल्या १२२० जणांमध्ये ६७७ पुरुष आणि महिला ५४३ आहेत. यात यवतमाळ येथील २७३ पॉझिटीव्ह रुग्ण, उमरखेड २२२, पांढरकवडा १५५, वणी १२६, मारेगाव ७२, दारव्हा ६६, पुसद ६५, दिग्रस ५९, नेर ४१, घाटंजी ३१, झरी २३, महागाव २१, आर्णी २१, बाभुळगाव १६, कळंब १५, राळेगाव ८ आणि इतर शहरातील ७ रुग्ण आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response