३३६ जणांंचा मृत्यूला जवाबदार कोण?
यवतमाळ: जिल्ह्यात सध्या कोरोना बांधीत रूग्णांचा मृत्यूचा आकडा दररोज वाढत चालला आहे.गेल्या वर्षभरात मृत्यू झाले नाही,ते एप्रिल महिन्याच्या वीस दिवसात म्हणजे तब्बल ३३६ जणांचा बळी गेला आहे.जिल्ह्यात वीस दिवसात ३३६ जणांचा मृत्यू हा गंभीर विषय असून याला जवाबदार नेमकं शासन की,प्रशासन असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
रामनवमी च्या दिवशी तब्बल ३९ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.मृत्यू या वेदनादायी रोजच्या बातमीने मानवी मन बोंधट झाले आहे.सुर्याला कवेत घेण्याचा असफल प्रयत्न शासन आणि प्रशासन करित आहे."मृत्यू" दररोज कुणाच्या ना कुणाच्या दरात चोरपावलांनी प्रवेश करतो आहे. "रोजमरे" त्याला कोणरडे! अशी अवस्था जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची झाली आहे.कोविड बांधित रूग्णांचा आकडा सर्वांच्याच अंगामध्ये धडकी भरविणारा आहे.
'माजी मंत्री राठोड कधी बोलणार'
संजय राठोड हे पालकमंत्री पदावर असताना जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण अतिशय कमी होते.मात्र दि.२६ मार्च रोजी तात्कालीन जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांची कोणतेही कारण नसतांना बदली करण्यात आली आणि मृतकांचा आकडा तीनशेच्या पार गेला.त्यामुळे राज्याचे माजी वनमंत्री संजय राठोड यांनी जिल्ह्याच्या कोरोना प्रस्थिती संदर्भात मुख्यमंत्री सोबत बोलून तोडगा काढण्याची गरज आहे.
जिल्ह्यातील हाच संभाव्य धोका लक्षात घेऊन तात्कालीन जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी जिल्ह्यावाशीयांच्या प्राणांची किंमत एकंदरीत लक्षात घेऊन गेल्या वर्षभरापासून पुर्ण प्रशासन सुतासारखे सरळ केले.स्वतः पी.पी.ई.किट घालून अनेक वेळा कोरोना बांधितांची भेटीगाठी घेऊन धीर दिला.विशेष म्हणजे तात्कालीन जिल्हाधिकारी सिंह यांनी १३ महिन्यात कोविड बांधित रूग्णांचा आकडा मर्यादीत ठेवला.मात्र दि.१ एप्रिल पासून अचानक कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने नेमकं याला जवाबदार कोण अशा सवाल उपस्थित केल्या जात आहे.
एप्रिल महिन्याच्या वीस दिवसात कोरोना मुळे मृत्यू झालेल्या रूग्णांचा आकडा तब्बल तीन शतक ची नोंद शासन दरबारी करण्यात आले असून दररोज च्या मृत्यूचा आकडा गगणाला गवसनी घालत आहे.प्रशासनातील कामचुकार अधिकारी हे महामारी च्या संकटात योग्य पध्दतीने काम करित नसल्याचा ठपक्का दि.८ मार्च रोजी तात्कालीन जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी विभागीय आयुक्त यांना लिहिलेल्या पत्रात आवर्जुन उल्लेख केला.मात्र विभागीय आयुक्तांनी त्या पत्राची दखल घेण्या ऐवजी त्यांनी वरिष्ठांना नकारात्मक माहिती देऊन तात्कालीन जिल्हाधिकारी सिंह यांची बदल करण्यास मोठा हातभार लावला.त्यामुळे जिल्ह्याची अवस्था अतिशय गंभीर बनली असून खुद राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लक्ष घालतील का अशी चर्चा या निमित्ताने सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response