विदर्भातील शिवसेनेचा ढाण्या वाघ माजी मंत्री शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांना एका प्रकरणावरून जोरदार आरोप झाल्यानंतर अधिवेशनाच्या तोंडावर म्हणजे काही तासाआधी राजीनामा द्यावा लागला होता.तेव्हा पासून शिवसेनेच्या एका गटात नाराजी तर दुसऱ्या गटात जल्लोष साजरा देखील झाला होता.
आमदार संजय राठोड यांची राजकारणात एण्ट्री शिवसेनेतूनच सुरू झाली आहे.सलग चौथ्यांदा आणि सर्वात जास्त मताधिक्याने निवडून येणारा आमदार म्हणुन संजय राठोड यांचा उल्लेख आवर्जून केल्या जाते.विशेष म्हणजे संजय राठोड यांना मंत्री पदाचा राजीनामा दिल्या नंतर खुद शिवसेनेत नाराजी उमटत असली तरी दुसऱ्या गोटात गुदगुल्या होत असल्याचे चित्र आहे.
आमदार संजय राठोड यांना पुन्हा मंत्री देण्यासंदर्भात खुद मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच सकारात्मक असल्याची माहिती आहेत.संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर प्रिंट मिडीयातील आणि विरोधी गटाचे काही पत्रकार राजीनामा केव्हा घेतात याबाबत दबक्या आवाजात ते चर्चा करत होते.कारण तांड्यातला माणूस राज्याचा वनमंत्री आणि जिल्हाचा पालकमंत्री झाल्याने ते पत्रकारांना बहुतेक सलत असावे.हल्ली पत्रकार देखील वाटल्या गेले आहे.त्यामुळे खरी पत्रकारिता निव्वळ नावाकरिताच राहीली आहे.
आमदार संजय राठोड यांच्या वर आरोप झाल्यानंतर राज्यात अनेक जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटले मात्र राठोड यांचा मतदारसंघ सोडला तर इतर ठिकाणी संजय राठोड यांच्या समर्थनात कोणीच पुढे येताना दिसले नाही.त्यामुळे राठोड यांना चिंतन करण्याची गरज आहे.
शिवसेना पदाधिकारी गप्प का होते?
यवतमाळ जिल्हाची शिवसेना आक्रमक म्हणुन 'मातोश्री' दरबारात नोंद आहेत.परंतू संजय राठोड यांच्या गंभीर आरोप झाल्या नंतरही यवतमाळचे शिवसेना पदाधिकाऱ्यांचे तोंड बंद होते.ना त्यांनी विरोधकांना प्रतीउत्तर दिला,ना साधी प्रतिक्रिया दिली त्यामुळे पदाधिकाऱ्यां बदल शंक्का व्यक्त केली जात आहे.संजय राठोड मंत्री असताना अनेक पदाधिकाऱ्यांनी कोट्यावधी रूपयांची कामे घेतली आहे.विशेष म्हणजे राठोड यांच्या मंत्रीपदाचा पुरेपूर फायदा त्यांनी घेतल्या नंतर आपल्या नेत्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप होत असताना त्या पदाधिकाऱ्यांनी तोंडातून ब्र शब्द काढू नये याबाबत उलटसुलट चर्चा आता रंगत आहे.
आमदार संजय राठोड यांना ऑगस्ट महिन्यात मंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडण्याची दाट शक्यता वर्तविली जात असून तशी हलचाली सुरू असल्याची माहिती शिवसेनेच्या गोटातून सुरू आहे.संजय राठोड यांनी राजीनामा दिल्या नंतर आता तरी त्या घटने पासून काही तरी बोध द्यावा आणि आक्रमक शिवसैनिकांना समोर आणण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी दबक्या आवाजात होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response