तात्कालीन जिल्हाधिकारी सिंह यांचे भाकित ठरले खरे
यवतमाळ: जिल्ह्यात गेल्या वर्षभरात कोरोनामुळे भयानक परिस्थितीत असताना तात्कालीन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कोरोना संकटात नागरिकांसाठी उपाययोजना केल्या.वेळप्रसंगी आरोग्य विभागाशी पंगा देखील घेतला त्यामुळे आरोग्य आणि महसुल संघटना जिल्हाधिकारी अशा सामना सुध्दा रंगला मात्र यांची कोणतीही तमा न बाळगता जिल्हाधिकारी सिंह हे लोकहितासाठी जे जे शक्य आहे.ते मी करणारच असे जाहीर केले.
तात्कालीन जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी खाजगी लेटरवर दि.८ मार्च रोजी साईओ,पोलीस अधिक्षक,डिएचओ सह अन्य अधिकाऱ्यांची विभागीय आयुक्त यांना कोरोना संकटात संबधित प्रशासनातील अधिकारी सहकार्य करित नसल्याचे जिल्हाधिकारी यांनी लक्षात आणुन दिले होते.तात्कालीन जिल्हाधिकारी सिंह यांनी दि.८ मार्च रोजी विभागीय आयुक्तांकडे लेटर वर केलेले भाकित सध्याच्या स्थितीत तंतोतंत खरे ठरत चालले आहे.दि.२६ मार्च पासून जिल्ह्यात मृतकांचा आकडा वाढत आहे.त्यामुळे सिंह यांचे भाकित खरे ठरले आहे.सीईओ,एसपी,सीएस,डिएचओ आदी अधिकारी कोरोना संकटाला गांभीऱ्यांने घेत नसल्याने जिल्ह्यात कोरोना संकट नव्याने डोकं वर काढणार असे भाकित करणारा पत्र दि.८ मार्च रोजी तात्कालीन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी विभागीय आयुक्त यांना दिले होते.
बदली कशासाठी?
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी १३ महिन्याचा कालावधीत लोकहिताचे अनेक प्रश्न सोडविले.कोरोना सारख्या महामारीत अचानक एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची बदली करणे किती योग्य आहे.गेल्या पंधरा दिवसात किती जणांना जीव गमवावा लागला यांची सर्व जवाबदारी विभागीय आयुक्त आणि तो काॅग्रेसचा सडकछाप नेता घेणार आहेत का अशा सवाल उपस्थितीत होत आहे.
काॅग्रेसच्या संपलेल्या एका नेत्यांने जिल्हाधिकारी सिंह यांनी आयुक्तांकडे केलेल्या पत्रव्यवहार ची माहिती घेऊन त्या पोपटपंचीने हस्तक्षेप करून मुख्य सचिव सोबत यावर चर्चा करून बदली करण्यास भाग पडल्याची माहिती समोर आली आहे. तात्कालीन जिल्हाधिकारी सिंह यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याची मोजमाप करता येणार नाही,त्यांनी जिल्हा पाॅझिटिव्ह असताना जिल्हा निगेटीव्ह केला हे नागरिकांना माहिती आहे.फक्त मला मान सन्मान मिळाला नाही,याची मनात खुन्नस ठेवून काॅग्रेसच्या त्या कोडं फुटलेल्या नेत्याने जिल्ह्याचा सत्यानाश करण्याच्या दृष्टीने डाव रचला आणि तो त्यात यशस्वी देखील झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response